आमदार मेघना बोर्डीकरांचे मुख्यमंत्र्यांना दुसरे पत्र, अत्यावश्यक बाब म्हणून मदत देण्याची केली मागणी

Meghna Sakore Bordikar

परभणी : परभणी जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्यांना अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अशा नुकसानीचे तातडीने पंचनामे करणे आवश्यक आहे. त्यासाठी जिंतूर विधानसभा मतदार संघातील आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. तत्काळ पंचनामे करुन मदत उपलब्ध करुन देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात आमदार बोर्डीकर यांनी म्हटले की, ‘जिल्ह्यातील शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतजमिनी घासून गेल्या असून पेरणी केलेले पीक वाहून गेले आहे. शेतीचे रुपांतर शेततळ्यांमध्ये होवून गेले आहे. जिल्ह्यातील प्रमुख आणि अंतर्गत रस्ते घासले गेले असून पूल वाहून गेले आहेत. या सर्व नुकसानीचे पंचनामे तातडीने होणे अत्यंत आवश्यक आहे. पंचनामे करुन परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने अर्थसहाय्य करण्यात यावे. तसेच पूल आणि रस्त्याच्या कामांसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात यावा.’

परभणी जिल्ह्यामध्ये ११ जुलै रोजी अतिवृष्टी झाली होती. त्या नंतर लगेचच २१ जुलै पासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. या सर्वांमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन अत्यावश्यक बाब म्हणून तत्काळ मदत उपलब्ध करुन देण्याची मागणी आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री दादा भुसे यांनाही पत्र पाठवले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP