fbpx

पावसाळ्यात वीजपुरवठा खंडीत होणार नाही याची दक्षता घ्या अन्यथा… महेश लांडगेंचा इशारा

टीम महाराष्ट्र देशा :पावसाळ्यात वीजपुरवठा खंडीत होणार नाही याची दक्षता घ्यावी . येत्या दोन दिवसांत सर्व तक्रारींचे निराकरण करून वीजपुरवठा सुरळीत करा. अन्यथा येत्या शनिवारी भोसरी, बालाजीनगर येथील महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकू, असा इशारा भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी दिला आहे.

पावसाला सुरुवात होताच वीज खंडित होण्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून भोसरी एमआयडीसीतील वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. आधीच दुष्काळाने आणि पाण्याने नागरिक त्रस्त झाले आहेत आणी आता लाईट जाने त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. दरम्यान, आमदार महेश लांडगे यांनी भोसरी मतदारसंघातील विजेच्या समस्या संदर्भात आणि पावसाळ्यात सातत्याने होणा-या खंडित वीज पुरवठ्याबाबत महावितरणचे अधिकारी, महापालिका विद्युत विभागाच्या अधिका-यांची बैठक घेतली. त्यात दोन दिवसांत विजेच्या सर्व समस्या मार्गी लावव्यात. महावितरणशी संबंधित सर्व प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावीत अशा सूचना अधिका-यांना दिल्या.

इतकेच नव्हे तर, भोसरी एमआयडीसीतील वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.गेल्या तीन दिवसांपासून भोसरीच्या विविध भागात वीज खंडित होण्याचा घटना घडल्या आहेत. दररोज चार-चार तास वीजपुरवठा खंडित होत आहे. परिवर्तन हेल्पलाईनवर तीन दिवसात सुमारे पाचशेतक्रारी आल्या आहेत. पावसाळ्यापूवीर्ची कामे अगोदरच पूर्ण करणे अपेक्षित होते. यापुढे फांदी तुटली, ट्रान्सफॉर्म उडाला, साहित्य नाही अशी कारणे चालणार नाहीत. नागरिकांना अंधारात ठेवू नका. पावसाळ्यात कोणत्याही परिस्थितीत वीजपुरवठा खंडित होता कामा नाही. पावसाळ्यात दुरुस्तीच्या कामासाठी अधिकच्या कर्मचा-यांची नियुक्ती करा.

पिंपरी-चिंचवड शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरु आहे. वीज नसेल तर नागरिकांना वरच्या मजल्यावर पाणी नेता येत नाही. उद्योजकांकडून महावितरणला अधिकचा महसूल मिळतो. काही ठिकाणाचे ट्रान्सफर ‘ओव्हर’ लोड झाले असून ते बदलण्यात यावेत. लघुउद्योजकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. पावसाळ्यात वीजपुरवठा खंडीत होणार नाही याची दक्षता घ्यावी . येत्या दोन दिवसांत सर्व तक्रारींचे निराकरण करून वीजपुरवठा सुरळीत करा. अन्यथा येत्या शनिवारी भोसरी, बालाजीनगर येथील महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकू असा इशारा आमदार लांडगे यांनी दिला.