शेतकऱ्यासाठी सरकार विरोधात आवाज उठविण्यासाठी मागे पुढे पाहिले नाही – आ. किशोर पाटील

टीम महाराष्ट्र देशा : बदरखे गावाच्या विकासासाठी मी सदैव तयार असून आजवर स्वर्गीय तात्यासाहेब आर ओ पाटील यांनी ग्राम सचिवालय तर माझ्या कार्यकाळात रस्ते , व्यायामशाळा यासारखी कामे सुरू आहेत. काही दिवसांवर विधानसभेचे निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. आजवर बदरखे पंचक्रोशीने मला भरभरून प्रेम दिले आहे. त्याची जाणीव आहे आणि राहील अशा भावना आमदार किशोर पाटील यांनी व्यक्त केल्या आहेत. जळगाव लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार उन्मेष पाटील यांचा नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

दरम्यान, गेल्या पाच वर्षात तालुक्यातील जनतेला विविध लाभ मिळवून दिला आहे. त्यासाठी शासनाशी मिळणारे बोंड आळी अनुदान याबाबत शासनाने लागू केलेल्या क्लिष्ट अटी शितल करावयासाठी विधानसभेमध्ये आवाज उठविण्यासाठी मागे पुढे पाहिले नाही अशी भूमिका देखील त्यांनी मांडली.