विद्यार्थ्यांना घाबरणारे सरकार चालवण्यास ‘ना’लायक – कपिल पाटील

मुंबई: मुंबई मधील भाईदास सभागृहातील छात्र भारतीच्या ३५ व्या राज्यस्तरीय संमेलनात गुजरातमधील दलित समाजाचे नेते जिग्नेश मेवाणी आणि ‘जेएनयू’मधील आंदोलनामुळे प्रकाशझोतात आलेला विद्यार्थी संघटनेचा नेता उमर खालिद यांची भाषणे होणार होती. मात्र, भीमा कोरेगाव हिंसाचार आणि महाराष्ट्र बंदमुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ऐनवेळी कार्यक्रमाला परवानगी नाकारली. आणि छात्र भारतीच्या अटक केली आहे.

याच पार्श्वभूमीवर आमदार कपिल पाटील यांनी सरकारवर तोफ डागली आहे. ते म्हणाले की, भीमा कोरेगावाच्या हिंसाचाराला कारणीभूत असणाऱ्या संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेंना सोडून सरकार शांततेच्या मार्गाने होणारी विद्यार्थ्यांची सभा उधळून लावत आहे. विद्यार्थ्यांना उचलून तुरूंगात टाकत आहे. विद्यार्थ्यांना तुरूंगात टाकणारे हे सरकार नाकर्ते आहे.