टीम महाराष्ट्र देशा : मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या मुंबईकरांच्या लापरवाहीमुळेचं मुंबईत वारंवार दुर्दैवी घटना घडतात या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यावार निशाणा साधला. मुंबईकरांनो, चला जाऊया आणि एखाद काढलेलं झाकण महापौरांच्या तोंडावर ठेवू या, असे आव्हाड यांनी म्हंटले.
गोरेगावमधील दिव्यांश सिंह नावाचा एक दीड वर्षांचा लहानगा नाल्यात पडून वाहून गेला आहे. या घटनेनंतर मुंबईकरांनी बीएमसीला दोषी ठरवले आहे. मात्र यावर महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मुंबईकरांनाचं दोषी ठरवले आहे. स्थानिक लोकांच्या लापरवाहीमुळे मुंबईमध्ये वारंवार अशा घटना घडत असल्याचे वक्तव्य महाडेश्वर यांनी केले.
दरम्यान त्यांच्या या वक्तव्यावर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी निशाणा साधला. मुंबईकरांनो, चला जाऊया आणि एखाद काढलेलं झाकण महापौरांच्या तोंडावर ठेवू या. म्हणजे महापौरांचे असंबद्ध बोलण तरी बंद होईल, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हंटले.
मुंबईकरच गटाराची झाकण उघडी ठेवतात; त्यामुळेच अपघात घडतात आणि लोक मृत्युमुखी पडतात.
– महापौर,
बृहन्मुंबई मनपामुंबईकरांनो, चला जाऊया आणि एखाद काढलेलं झाकण महापौरांच्या तोंडावर ठेवू या. म्हणजे असंबद्ध बोलण तरी बंद होईल.#Mumbai #Mumbaikars #MumbaiRains
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 11, 2019
इतकेच नव्हे तर महापौर महाडेश्वर यांच्या या वक्तव्यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही टीकास्त्र सोडले आहे. अनधिकृत शेड किंवा मजला चढवला की पालिकेचं व्हिजिलन्स पथक तातडीने धाव घेतं. पण नाल्यावरचं उघडं झाकण, उन्मळून पडू शकणारं झाड, खचलेलं धोकादायक मॅनहोल, उखडलेले पेव्हर्स मात्र महापालिकेच्या पथकांना दिसत नाहीत. अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसने केली. तसेच तीस हजार कोटींची पालिका पोसणं हीच मुंबईकरांची चूक आहे का? असा सवालही राष्ट्रवादीने केला.
अनधिकृत शेड किंवा मजला चढवला की पालिकेचं व्हिजिलन्स पथक तातडीने धाव घेतं. पण नाल्यावरचं उघडं झाकण, उन्मळून पडू शकणारं झाड, खचलेलं धोकादायक मॅनहोल, उखडलेले पेव्हर्स मात्र @mybmc पथकांना दिसत नाहीत. 30K कोटींची पालिका पोसणं हीच मुंबईकरांची चूक? @ShivSenahttps://t.co/Z04rva7GNu
— NCP (@NCPspeaks) July 11, 2019