fbpx

जयकुमार गोरेंच्या विरोधात सर्वपक्षीय एकवटले, पराभव करण्याचा केला निर्धार

टीम महाराष्ट्र देशा : माण-खटावचे कॉंग्रसचे आमदार जयकुमार गोरे यांचा आगामी विधानसभा निवडणुकीत दुप्पट मतांनी पराभव करण्याचा जंग सर्वपक्षीय बैठकीत बांधण्यात आला आहे. गोरे यांचे माण-खटाव तालुक्याच्या विकासात योगदान नाही. निवडणुकीच्या तोंडावर ते केवळ चमकोगिरी करतात, असा आरोप करत हा जंग बांधण्यात आल्याचे समोर आले आहे.

आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. याचदरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांचा पराभव करण्यासाठी सर्व पक्षीय नेत्यांनी साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये बैठकीचे आयोजन केले होते, दरम्यान गोरे यांचे माण खटाव तालुक्याच्या विकासात योगदान नाही. निवडणुकीच्या तोंडावर ते केवळ चमकोगिरी करत असून आमचं आता ठरलंय आमदार जयकुमार गोरे यांचा दुप्पट मतांनी पराभव करणार, असा इशारा या बैठकीत देण्यात आला.

या बैठकीत भाजपचे माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रभाकर घार्गे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई, शिवसेनेचे रणजितसिंह देशमुख रासपचे जिल्हाध्यक्ष मामू शेठ विरकर, डॉ. संदीप पोळ, वडूजचे नगरसेवक अनिल माळी उपस्थित होते.