बाजारबुणग्यांचे ठरायच्या अगोदर माझं ठरलंय अन हनीमुन पण झालाय – जयकुमार गोरे

blank

टीम महाराष्ट्र देशा : ज्यांची साधी जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती सदस्य व्हायची लायकी नाही, अशा माण- खटावमधील बाजारबुणग्यांचे ठरायच्या अगोदर माझे बरेच काही ठरलेय. हनीमुनपण झालेय. ज्यांना साधे बसचे तिकीट मिळायची मुश्कील आहे ते माझ्या तिकीटाला विरोध करत आहेत. पण या जयकुमारने लोकसभेचे तिकीट आणि खासदारकीही आणली हे त्यांनी विसरु नये.

आमचं ठरलयं म्हणणारे फक्त मला आडवायला एकत्र आलेत. त्यांना माण खटावच्या पाणीप्रश्नाचे काही देणे घेणे नाही. एकत्र यायची बुद्धिपण त्यांची नाही. बारामतीतून चावी मिळाल्याने त्यांचे माकडचाळे सुरु आहेत, अशी बोचरी टीका आमदार जयकुमार गोरे यांनी विरोधकांवर केली. त्यांचे काहीही ठरले असले तरी माझी पाणी प्रश्नाबाबतची प्रामाणिक भूमिका आणि प्रयत्न जनतेला माहित आहेत. माझी लढाई दुष्काळाशी आहे. माझी बांधीलकी इथल्या जनतेशी आहे.

माझा पक्षच जनता आहे. त्यामुळे कुणीही कितीही प्रयत्न केले तरी माझे काहीही बिघडणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. बोराटवाडी येथे प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला माण आणि खटावमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

महत्वाच्या बातम्या 

कॉंग्रेसची चिंता वाढली, ‘हा’ दिग्गज नेता निवडणुकीतून माघार घेण्याच्या तयारीत
काँग्रेसच्या ‘या’ दिग्गज नेत्याने स्वीकारले मुख्यमंत्र्यांचे चॅलेंज
भाजपने आपलं चिन्ह बदलून ‘कमळावर घड्याळ आणि हात’ असं ठेवावं
राज ठाकरे यांनी पक्षवाढीवर लक्ष केंद्रीत करावे, रामदास आठवलेंचा प्रेमाचा सल्ला