पिसाळलेले कुत्रे चावले तर या वयात सोसणार नाही, आ. गोरेंचा रामराजेंवर निशाणा

टीम महाराष्ट्र देशा: रामराजे निंबाळकर यांनी नीरा देवधर पाणी प्रश्नावरून केलेल्या विधानावर सध्या सातारा जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले आहे, रामराजे यांनी काल टीका करताना सातारा जिल्ह्यात तीन पिसाळलेली कुत्री असल्याचं म्हणत भाजप खा. रणजितसिंह निंबाळकर, खा. उदयनराजे आणि आ. जयकुमार गोरे यांच्यावर टीका केली होती. दरम्यान आता गोरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

रामराजे यांनी केलेली टीका सभापती पदाला शोभणारी नाही. त्यांच्याकडे मंत्रिपद असतानादेखील कालव्याचा प्रश्न मार्गी लावला नाही. बारामतीशी चाकरी करण्यासाठी नीरा देवघरचं पाणी त्यांनी बारामतीकडे वळविले, असा घणाघात आ. जयकुमार गोरे यांनी केला आहे.

Loading...

आम्ही पिसाळलेली कुत्री आहोत हे म्हणणे रामराजे यांना शोभत नाही, त्यांना पिसाळलेले कुत्रे चावल्यास या वयात इंजेक्शन सोसणार नाही, असा टोलाही गोरे यांनी लगावला आहे. दरम्यान, त्यांनी आता वयाचा विचार करत निवृत्ती घ्यावी, असा सल्लाही गोरे यांनी दिला आहे.

साताऱ्यात पिसाळलेली तीन ‘कुत्री’, भडकलेल्या रामराजेंकडून उदयनराजेंची तुलना ‘कुत्र्याशी’

नीरा देवधरच्या पाण्यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेस खासदार उदयनराजे यांनी रामराजे यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता, तर आता उदयनराजे यांना उत्तर देताना रामराजेंची जीभ घसरली आहे. साताऱ्यात पिसाळलेली तीन कुत्री आहेत, ती जागेवर येईपर्यंत आपणही पिसाळलेलेचं राजकारण करू, अशी टीका करत रामराजे निंबाळकर यांनी खा. उदयनराजे, खा. रणजितसिंह निंबाळकर आणि आ. जयकुमार गोरे यांची तुलना कुत्र्याशी केली होती. तसेच शरद पवारांनी उदयनराजेंना आवराव, अन्यथा आपण पक्षातून बाहेर पडू, असा इशारा दिला आहे.

रामराजेंनी बारामतीचा पट्टा गळ्यात बांधलाय, ह्यांना रस्त्यावर जोडे मारले पाहिजेत – खा. रणजितसिंह

रामराजे निंबाळकर यांनी छत्रपतींच्या घराण्यावर केलेली टीका त्यांना शोभते का? आपल वय वाढल्यामुळे लोकांवर टीका करताना ते पिसाळलेली कुत्री म्हणतात, त्यांना पाण्याचे खाते सांभाळूनही पाणीच कळले नाही, रामराजे हे बारामतीकरांचा पट्टा गळ्यात बांधल्याप्रमाणे वागत आहेत. सरकारने दुष्काळी जनतेला पाणी माघारी देण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यामध्ये त्रुटी काढण्याच काम ते करत आहेत, अशा लोकांना जोडे मारत मतदारसंघातून हाकलून दिल पाहिजे, अशी घणाघाती टीका खा रणजितसिंह यांनी केली आहे.

 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
...अन्यथा इंदोरीकरांच्या तोंडाला काळं फासू; असा इशारा देणाऱ्या तृप्ती देसाईंवर मनसेच्या रणरागिणीचा प्रतिइशारा
इंदुरीकर-देसाई वादात आता 'भोर' महाराजांची ऊडी ; देसाईंना कापून टाकण्याची धमकी
'...यासाठी राज ठाकरेंची दहशत हवीच'
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
कुख्यात चंदन तस्कर वीरप्पनच्या मुलीचा भाजपमध्ये प्रवेश