मी भाजपमध्ये जाणार असं म्हणणाऱ्यांनी आधी डोकं तपासून घ्यावं – जयकुमार गोरे

टीम महाराष्ट्र देशा : भाजपाचे मण-खटाव विधानसभा अध्यक्ष डॉ. महादेव कापसे यांच्या आमदार जयकुमार गोरे यांचा जनाधार राहिला नसल्यामूळे ते आता कधीच निवडून येणार नाहीत. म्हणून ते भाजपाच्या प्रवेशासाठी धडपडत आहेत, या टीकेला आमदार जयकुमार गोरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मी भाजपमध्ये जाणार असं म्हणणाऱ्यांनी आधी डोकं तपासून घ्यावं, असे आमदार गोरे यांनी म्हंटले.

कॉंग्रेसचे जेष्ठ नेते राध्कृष्ण विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगलेल्या असताना, कॉंग्रेसचे अनेक आमदार भाजपत प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते यामध्ये आमदार जयकुमार गोरेंचाही समावेश होता, परंतु काल राधाकृष्ण विखे पाटील यांचा भाजप प्रवेश झाला त्यांची मंत्रिमंडळात वर्णीही लागली. दरम्यान, आमदार गोरेंचाही भाजप प्रवेश होणार असल्याची चर्चा आहे. परंतु आमदार गोरेंच्या भाजप प्रवेशाला भाजप पदाधिकार्यांनी विरोध केला आहे.

Loading...

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकी संदर्भात दहिवडी येथील पक्ष कार्यालयात भाजपच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक पार पडली. याबैठकीत आमदार जयकुमार गोरे यांना भाजपात प्रवेश देऊ नये, असा ठराव करण्यात आला. इतकेच नव्हे तर, जयकुमार गोरे यांचा काँग्रेसमध्ये सध्या दंडेलशाही कारभार सुरू आहे. त्याठिकाणी त्यांनी उत्मात घातला असल्याने त्यांच्या निकटचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते त्यांना सोडून गेले आहेत. त्यामुळे पक्षात, लोकांमध्ये त्यांचा जनाधार राहिलेला नाही. त्यामुळे त्यांना भाजपात घेतल्यास पक्षाशी प्रामाणिक असणार्‍या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे आमदार गोरे यांना पक्षात घेऊ नये. असे मत पदाधिकार्यांनी बैठकीत व्यक्त केले.

दरम्यान, आमदार गोरे यांनी या बैठकीवरून विरोधकांवर जोरदार टीका केली गोरे यांना भाजपात प्रवेश देऊ नये, असा ठरावही प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत एकमताने करण्यात आला. परंतु मी भाजपमध्ये जाणार असं त्यांना कोणी सांगितलं. असे गोरे यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, भाजपमध्ये मी जाणार असं म्हणणाऱ्यांनी आधी डोकं तपासून घ्यावं. माझ्याविरोधात ठराव करणारे सर्वजण अदखलपात्र आहेत. माझं नाव घेण्याचा अधिकार तरी त्यांना आहे का ? त्यांनी पहिल्यांदा स्वत:चं अस्तित्व पहावं. गावात त्यांची लायकी आहे का हे ही बघावं, अशी टीकाही गोरे यांनी केली.

 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अरे तुम्ही काय संरक्षण काढता, पवारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील पैलवान सरसावले
धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
अजित पवारांचे मेहुणे अमरसिंह पाटील यांचं निधन
जातीवाद रोखण्यासाठी शरद पवार मैदानात; सरकार उचलणार 'हे' पाऊल
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांची गुंडगिरी, 'इंडियन ऑईल'च्या अधिकाऱ्यांना केली हाणामारी
#शिवभोजन : ज्यांची ऐपत आहे त्यांनी 'शिवभोजन' घेऊ नये : अजित पवार
राष्ट्रवादीची गुंडगिरी : भाजपने केला सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल
सलमान अजूनही कतरीनाच्या प्रेमात स्वत:च दिली कबुली