fbpx

आता आ. जयदत्त क्षीरसागर राष्ट्रवादीला रामराम करण्याच्या तयारीत

munde vs jaydatta kshirsagar

बीड: राष्ट्रवादी कॉंग्रेस आमदार जयदत्त क्षीरसागर विरुद्ध धनंजय मुंडे असा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामीण विकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत पार पडलेला बीड नगरपरिषरीषदेचा कार्यक्रम याला कारणीभूत ठरत आहे. त्यानंतर आता आ. जयदत्त क्षीरसागर राष्ट्रवादीला रामराम करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा पुन्हा एकदा सुरु झाल्या आहेत.

राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता असणाऱ्या बीड नगरपरिषदेच्या विविध विकासकामांचे उदघाटन मंगळवारी पार पडले. आ. जयदत्त क्षीरसागर आणि नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांनी स्वपक्षातील नेत्यांना डावलत मुख्यमंत्री फडणवीस आणि पंकजा मुंडे यांना कार्यक्रमासाठी निमंत्रित केले होते. यावेळी शहरात लावण्यात आलेल्या पोस्टर्सवर देखील राष्ट्रवादीच्या कोणत्याच नेत्याला स्थान देण्यात आलं नाही. त्यामुळे बीड राष्ट्रवादीमध्ये असणारी उभी फुट दिसून आली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि क्षीरसागर यांच्यामध्ये मागील काही दिवसांपासून दुरावा निर्माण झाला आहे. धनंजय मुंडे हे क्षीरसागर यांचा पुतण्या संदीप क्षीरसागर यांच्या पाठीशी आपली ताकद लावत आहेत. त्यामुळे पक्षाच्या अनेक कार्यक्रमात जयदत्त क्षीरसागर यांना डावलण्यात आल्याचं दिसत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ज्या प्रकारे सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या राजकारणाला कंटाळून पक्षाला रामराम ठोकला त्याप्रमाणे जयदत्त क्षीरसागर हे देखील राष्ट्रवादी सोडतील अशी चर्चा बीडमध्ये रंगत आहे.

1 Comment

Click here to post a comment