राज्यसरकारबरोबरच विधीमंडळानेही गदिमांचा यथोचित सन्मान करावा : आमदार हेमंत टकले

नागपूर – गदिमांचा एकूण जीवनपट बघितला तर त्यांची १२ ते १३ पुस्तके प्रसिध्द आहेत. गीतरामायण आहे आणि एकूण ७५ चित्रपटांसाठी त्यांनी गीते लिहिली आहेत. इतकं मोठं काम असणाऱ्या या महाकवीला मानाचा मुजरा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने संबंध राज्यभरात वर्षभरात कार्यक्रम घ्यावेच शिवाय विधानपरिषदेचे सदस्य म्हणून विधीमंडळानेही यथोचित सन्मान करावा अशी मागणी आमदार हेमंत टकले यांनी सभागृहात केली.

गदिमानी लोकांच्या मनावर राज्य केले. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये गीत रचना चिरंतन स्वरुपाच्या आहेत. केवळ साहित्य क्षेत्रातच अग्रगण्य भूमिका नव्हे तर समाजजीवनातील सर्व घटकांमध्ये गदिमा हा सदैव जपण्याचा सांस्कृतिक संच होता असे उदगार यावेळी आमदार हेमंत टकले यांनी काढले.

विशेष म्हणजे सन १९६२ ते १९६८ या कालावधीत याच विधानपरिषदेचे गदिमा सदस्य होते. खऱ्या अर्थाने त्या कालावधीत परिषदेचा सुवर्णकाळ होता. त्याच कालावधीत प्रसिध्द संगीतकार वसंत देसाई हेसुध्दा परिषदेचे सदस्य होते. सध्या गदिमांचे जन्मशताब्दीचे वर्ष सुरु होणार आहे. पुढे वर्षभर कार्यक्रम होणार आहेत. सरकारला विनंती आहे की, महाराष्ट्राचे एक मान्यवर कवी ग.दि.माडगुळकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त राज्यात सर्व ठिकाणी कार्यक्रम जरुर घ्यावेत परंतु त्याचबरोबर आपल्या विधीमंडळाने गदिमांच्या जन्मशताब्दीनिमित्त महोत्सव अतिशय चांगल्या पध्दतीने घ्यावा अशी विनंती आमदार हेमंत टकले यांनी केली.

आज योगायोगाने ही माहिती घेताना आपल्याला लायब्ररीमध्ये गदिमांचे हस्ताक्षर मिळाले आहे. त्यांनी स्वत:ची माहिती त्यात लिहिली आहे. त्याच्यामध्ये आश्चर्याची गोष्ट अशी की, त्यांनी आपले शिक्षण मॅट्रीक अनुत्तीर्ण असं लिहिलं आहे असेही आमदार हेमंत टकले यांनी सांगितले.

आमदार हेमंत टकले यांनी मांडलेली सूचना ही योग्य असून सभागृह नेत्यांनी संबंध राज्यभर कार्यक्रम घ्यावा. ते आपल्या सदनाचे सदस्य होते त्यामुळे उचित कार्यक्रम आपण घ्यावा असे आदेश सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी यावेळी दिले.

विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी संपन्न

जेष्ठ अभिनेते निळू फुले यांची आज पुण्यतिथी

शरद पवारच होणार पंतप्रधान ; डॉ. डी. वाय. पाटलांची भविष्यवाणी