आमदार गोरेंची तुपकरांना टाळी आणि प्रभाकर देशमुखांच्या गालावर फुलली खळी

माण: लोकसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकण्यास अवघे काही दिवस राहिले आहेत.त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आपला मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरवात केली आहे. यामध्ये माढा लोकसभा मतदारसंघ सध्या राज्यामध्ये चर्चेचा विषय बनला आहे. यातच आज माणचे आमदार जयकुमार गोरे यांनी स्वाभिमानीकडून इच्छुक असणाऱ्या रविकांत तुपकर यांना दिलेली टाळी आणि यावेळी उपस्थित असणारे राष्ट्रवादी इच्छुक प्रभाकर देशमुख यांच्या गालावर फुललेली खळी सध्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून समजल्या जाणाऱ्या माढा मतदारसंघात यंदा पक्षातच चुरस निर्माण झाली आहे. विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या सोबतीने माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे. यामध्ये भाजपची साथ सोडून राष्ट्रवादीची कास धरणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने देखील माढ्यावर दावा केला आहे. संघटनेकडून रविकांत तुपकर यांचे नाव आघाडीवर आहे. आज देशमुख आणि तुपकर हे दोन्ही इच्छुक कार्यक्रमा निमित्त माणमध्ये एकत्र आले होते. यावेळी उपस्थित असणारे आ. जयकुमार गोरे आणि दोन्ही इच्छुकांमध्ये चांगलाच हशा पिकल्याचं पहायला मिळाल.

Loading...

माढा लोकसभा मतदारसंघामध्ये माण विधानसभा मतदारसंघाचा समावेश होते. जयकुमार गोरे हे येथील विद्यमान आमदार आहेत. मध्यंतरी सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांच्या पुढाकाराने झालेल्या मोहिते पाटील विरोधी गटाच्या बैठकीला गोरे हे देखील उपस्थित होते.आगामी निवडणुकीसाठी मोहिते पाटील विरोधी उमेदवाराला मदत करण्याचे धोरण यावेळी ठरवण्यात आल्याचं बोललं गेलं. त्यामुळे आज जयकुमार गोरे, प्रभाकर देशमुख आणि तुपकरांमध्ये रंगलेल्या चर्चेत नेमकं काय घडलं हे मात्र गुलदस्त्यात आहे.

दुसरीकडे, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्या आज वाढदिवस असल्याने रविकांत तुपकर यांनी देशमुख यांच्या लोधवडे येथील निवासस्थानी भेट देत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी स्नेहभोजनासह दोन्ही इच्छुकांत गूफ्तगू रंगल्याचं पहायला मिळाल.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
...अन्यथा इंदोरीकरांच्या तोंडाला काळं फासू; असा इशारा देणाऱ्या तृप्ती देसाईंवर मनसेच्या रणरागिणीचा प्रतिइशारा
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
बालेकिल्ल्यात भाजपला धक्का; मेहतांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी-सेनेची माफी मागत भाजप सोडली
'...यासाठी राज ठाकरेंची दहशत हवीच'
'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक 'मतदान' करतात' : बच्चू कडू
इंदुरीकर-देसाई वादात आता 'भोर' महाराजांची ऊडी ; देसाईंना कापून टाकण्याची धमकी