तब्बल अकरा वेळा विजयी झालेल्या ‘या’ आमदाराची यंदाच्या निवडणुकीतून माघार

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणूकीनंतर आता सर्वत्र जोमाने विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. सर्वच पक्षांनी पक्षबांधणी, राजकीय दौरे, भेटीगाठी यांसारख्या राजकीय घडामोडींना उधाण आले आहेत. याच पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघातून तब्बल अकरा वेळा विजयी झालेले आमदार गणपतराव देशमुख यांनी यंदाची विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

वाचा काय आहे निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेण्याचे कारण

आमदार गणपतराव देशमुख यांनी प्रकृती अस्वास्थाच्या कारणामुळे मी विधानसभा लढवणार नसल्याचे नुकतंच त्यांनी स्पष्ट केले आहे.

गणपतराव देशमुख यांनी राजकीय वाटचाल

1962 ला त्यांनी सांगोल्यातून सर्वप्रथम निवडणूक लढली
1978 मध्ये शरद पवार यांनी पुलोद सरकार स्थापले त्यावेळी त्यांचा मंत्रिमंडळात समावेश
1999 मध्ये गणपतराव देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश
2012 मध्ये आमदार म्हणून विधानसभेतील त्यांच्या सहभागास 50 वर्षे पूर्ण झाल्याने सभागृहासह सरकारनेही त्यांचा गौरव केला होता

दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेते मंडळी पक्षांतर करत आहे. यामुळे भाजप-सेना युतीला ताकद मिळत आहे मात्र आघाडी निवडणुकीच्या तोंडावर खिळखिळीत होत आहे.