VIDEO: कट्टर विरोधक आमदार दिलीप सोपल आणि राजेंद्र राऊत यांचे ‘फु बाई फु’

कट्टर विरोधकांच्या फुगडीने बार्शीकर सुखावले....पहा व्हिडियो

बार्शी: गेली २५ वर्षे बार्शी तालुक्याच्या राजकारणातील कट्टर विरोधक असणारे आमदार दिलीप सोपल आणि माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी आज चक्क फुगडी खेळली आहे. याला निमित्त ठरले आहे ते भगवंत प्रकटोत्सवा निमित्त काढण्यात आलेल्या भगवंत दिंडीचे.

भगवंत मंदिर देवस्थान आणि बार्शी नगरपालिकेच्या वतीने मागील दहा दिवसांपासून भगवंत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. आज भगवंत प्रकटोत्सवा निमित्त शहरातून दिंडी काढण्यात आली. आमदार दिलीप सोपल यांच्या हस्ते दिंडीचा शुभारंभ करण्यात आला, यावेळी माजी आमदार राजेंद्र राऊत देखील उपस्थित होते.

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

या दिंडी दरम्यान समस्त बार्शीकरांना सुखावणारे दृश्य पहायला मिळाले आहे. टाळ मृदुंगाच्या गजरात दिंडीला सुरुवात झाली तेंव्हा लोक आग्रहास्तव दिलीप सोपल आणि राजेंद्र राऊत यांनी फुगडीच्या गिरक्या घेतल्या . राजकीय फडात कायम एकमेकांना चीतपट करण्यासाठी तयार असणाऱ्या दोन्ही नेत्यांना फुगडी खेळताना पाहून कार्यकर्त्यांमध्ये देखील चांगलाच उत्साह दिसून आला.

Shivjal