fbpx

काय सांगता ! बलात्काराची तक्रार करणाऱ्या महिलेसोबत आरोपी आमदाराने केले लग्न

टीम महाराष्ट्र देशा- त्रिपुरातील सत्ताधारी ‘आयपीएफटी’चे आमदार धनंजय त्रिपुरा यांच्यावर बलात्कार आणि फसविल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. ही तक्रार दाखल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. मात्र आता या प्रकरणात नवे वळण आले असून आरोपी आमदाराने चक्क तक्रार करणाऱया महिलेशी लग्न करून हे प्रकरण निकाली काढले आहे.

बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यावर आमदाराची चांगलीच अडचण झाली.त्यांनी अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी त्रिपुरा उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र १ जून रोजी न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. दोन्ही पक्षांनी तडजोड झाली असल्याने आता हे प्रकरण मिटले असून तक्रारदार महिला आता आमदार धनंजय त्रिपुरा यांच्यासोबत ढलई जिह्यातील गांडाचेर्रा येथे राहत आहे, असे वकील अमित देववर्मा यांनी सांगितले.

इंडिजीनिअस पीपल फ्रंट ऑफ त्रिपुराचे आमदार धनंजय त्रिपुरा यांनी चतुरादास देवता मंदिरात रविवारी तक्रारदार महिलेशी लग्न केले आहे. या विवाहाचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी आज संबंधित खात्याकडे वैध कागदपत्रे सादर केली जाणार आहेत.