आमदार कॉंग्रेसचा मात्र तुळजापूरला भाजपच्या रोहन देशमुखांमुळे मिळाला कोट्यावधीचा निधी

तुळजापूर : विधानसभेला जनतेने कॉंग्रेसचा आमदार निवडून दिला असला तरी भाजपच्या माध्यमातून सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे पुत्र भाजपा युवा नेते रोहन देशमुख यांच्या प्रयत्नांतून तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी तब्बल २ कोटींचा निधी आला आहे. त्यामुळे सर्व स्तरातून रोहन देशमुख यांचे कौतुक होत आहे.

आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या पार्श्वभूमीवर रोहन देशमुख हे या भागात जोरदार काम करत आहेत. २०१४च्या लोकसभेला देशमुख अपक्ष उभा राहिले होते. त्यानंतर आता येणाऱ्या लोकसभेला पक्षाकडून उमेदवारी मिळाली तर उभा राहण्याच्या तयारीत आहेत. परंतु विधानसभेला तुळजापूर तालुक्यातून भाजपकडून अधिकृत उमेदवारी मिळवून उभा राहण्याची तयारी त्यांनी सुरु केली आहे. गेल्या चार वर्षापासून देशमुख मतदार संघात गाठी-भेटी, तसेच जनता दरबारच्या माध्यमातून नागरिकांच्या अडचणी सोडवत आहेत. या विधानसभा मतदार संघात रोहन देशमुख जातीने लक्ष देत आहेत. तालुक्यातील छोट्यात छोट्या गावात त्यांनी जनता दरबारच्या माध्यमातून कामे केली आहेत.

Loading...

ग्रामीण भागांतर्गत मूलभूत सुविधा योजना २५१५ अंतर्गत भाजपा युवा नेते रोहन देशमुख यांच्या पुढाकारातून तुळजापूर विधानसभा क्षेत्रातील रस्त्यांच्या काँक्रीटीकरण कामांसाठी तब्बल २ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे- पालवे व सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे केलेल्या मागणी व पाठपुराव्यातून स्मार्ट रस्त्यांच्या कामासाठी मोठा निधी मिळविण्यात यश मिळाले आहे.

या २५१५ योजनेअंतर्गत तुळजापूर तालुक्यातील दिंडेगाव, नांदुरी, वडगाव काटी, मासला खुर्द, माळुब्रा, खुदावादी, सांगवी काटी, दहिवाडी, चिवरी, कुंभारी, देवसिंगा, निलेगाव, कसई, होर्टी, काटी, शहापूर, धोत्री, तीर्थ खुर्द, सुरतगाव, सिंदफळ व उस्मानाबाद तालुक्यातील वाघोली, बेंबळी, केशेगाव, रुईभर, अनसुर्डा, बोरखेडा, उपळा, बामणी, तोरंबा येथील ६७ रस्त्यांच्या कामांसाठी तब्बल १ कोटी ९७ लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे.

यापूर्वी राज्यसभा खासदार संजय काकडे यांच्या निधीतून विविध विकास कामांसाठी ५० लाख निधी मिळाला होता, त्यातील कामे पूर्णत्वास आली असून काही प्रगतीपथावर आहेत. विधानसभा क्षेत्राचा विकास करण्यासाठी आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने रोहन देशमुख यांनी मतदार संघात गाठी भेटी तसेच जनता दरबारच्या माध्यमातून नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध आहेत. मोठा निधी मिळाल्यामुळे तुळजापूरची विकासाकडे वाटचाल होत आहे. यामुळे कार्यकर्ते, रोहन देशमुख समर्थक व तुळजापूरकरांमध्ये सकारात्मक व विकासावर चर्चा होत असून समाधान व्यक्त होत आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
घ्या आता ! इंदुरीकर म्हणाले, मी असं बोललोच नाही
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
ही सदिच्छा भेट आहे. बाकी तपशिलात खोल शिरण्याची गरज नाही - खा. संजय राऊत
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'
झोपड्यांना हात लावाल तर याद राखा - केंद्रियमंत्री रामदास आठवले यांचा सरकारला इशारा
भाजप नेत्यानेच उपस्थित केला सवाल, उदयनराजेंचे भाजपसाठी योगदान काय?