सुप्रिया सुळे यांच्या हस्ते आ.चव्हाणांचा सत्कार

औरंगाबाद– औरंगाबाद पदवीधर मतदार संघातून विक्रमी मताधिक्याने निवडून आल्याबद्दल औरंगाबाद जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील मान्यवर तसेच प्राध्यापकांच्या वतीने आमदार सतीश चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते झालेल्या सत्कार समारंभाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले अध्यक्षस्थानी होते.

यावेळी नवनिर्वाचित आमदार सतीश चव्हाण यांच्यासह त्यांच्या सुविद्य पत्नी आशा चव्हाण, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम काळे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयसिंगराव गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

संयोजन समितीच्या वतीने डॉक्टर राजेश करपे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि मानपत्र देऊन सतीश चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुधीर गव्हाणे यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील प्राध्यापक शिक्षक आणि संस्थाचालकांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

महत्वाच्या बातम्या