Bhaskar Jadhav | मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांची १०० दिवसानंतर तुरुंगातून सुटका होत आहे. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी राऊत तुरुंगात होते. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना बुधवारी न्यायालयाने जामीन मंजूर केला. 1 ऑगस्ट रोजी ईडीने अटक केलेल्या संजय राऊतला तीन महिन्यांनी जामीन मिळाला. संजय राऊत यांना 2 लाखांच्या जामिनावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी मोठी झेप घेतील, असे जाधव म्हणाले.
संजय राऊत झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी मोठी झेप घेतील. संजय राऊत लढवय्ये आहेत, असे भास्कर जाधव म्हणाले. आज आम्ही सर्व आनंदात आहोत. संजय राऊत आमचे नेते आहेत. ते एक लढवय्ये तत्वनिष्ठ नेते आहेत. आपल्या भूमिकेशी ठाम राहणारे नेते आहेत. या देशात लोकशाहीवर घाला घातला जात होता. या विरोधात संजय राऊत लेखणीने प्रहार करत होते. त्यांना थांबवण्याचा प्रयत्न झाला पण ते थांबू शकले नाहीत. म्हणून शेवटचा पर्याय म्हणून त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं. जेलमध्ये टाकत असताना खोट्या केसेस करण्यात आल्या. खोटे पुरावे तयार करण्यात आले, असे भास्कर जाधव म्हणाले.
काय आहे प्रकरण-
पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांना 31 जुलै रोजी रात्री उशिरा ईडीनं अटक केली होती. त्यानंतर राऊतांना प्रथम ईडी आणि त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, तेव्हापासून राऊत आर्थर रोड कारागृहात आहेत. ईडीने संजय राऊत यांचा पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांचा थेट हात असल्याचा आरोप केला. त्यांचे भाऊ प्रविण राऊत पत्राचाळ डेव्हलेपमेंट पाहत होते. त्यांना HDIL ग्रुपकडून 112 कोटी रुपये मिळाले. त्यातील 1 कोटी 6 लाख 44 हजार रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात पाठवले गेले. अलिबाग येथे याच पैशातून जमीन खरेदी करण्यात आली होती. संजय राऊत हेच प्रविण राऊत यांना समोर करुन सर्व व्यवहार करत होते असं ईडीने म्हटलं आहे. या संदर्भात कोर्ट आज काय निर्णय देणार याकडे सर्वांच लक्ष होतं. अशातच संजय राऊतांना जामीन मिळाला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Chandrakant Khaire | “हा त्यांच्या लेखणीचा विजय”; राऊतांच्या जामीनानंतर चंद्रकांत खैरेंची प्रतिक्रिया
- IND vs ENG 2nd Semifinal | भारताला दुसरा धक्का, रोहितनंतर विराट कोहली जखमी
- Supriya Sule । संजय राऊतांना जामीन मंजूर होताच सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या,
- Aaditya Thackeray | “तोफ पुन्हा रणांगणात आली” ; संजय राऊतांच्या जामीनानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया
- Sushma Andhare | संजय राऊतांचा जामीन मंजूर झाल्यानंतर सुषमा अंधारे ढसाढसा रडल्या