fbpx

सोलापूरमध्येही कॉंग्रेसला खिंडार, जिल्ह्यातील ‘हा’ आमदार करणार विखेंसोबत भाजप प्रवेश ?

टीम महाराष्ट्र देशा: कॉंग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज आपल्या कॉंग्रेस आमदारकीचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसमध्ये घुसमट होत असून त्यामुळे आज आमदारकीचा राजीनामा दिला, असं यावेळी विखे पाटील यांनी सांगितले आहे. दरम्यान, विखे पाटील यांनी राजीनामा देण्यापूर्वी समर्थक आमदारांची बैठक घेतली आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील पंढरपुरचे कॉंग्रेस आ. भारत भालके आणि माण- खटावचे जयकुमार गोरे हे देखील उपस्थिती होते.

लोकसभा निवडणुकीमध्ये सुजय विखे यांना अहमदनगरची जागा सोडण्यात न आल्याने विखे पाटील यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती, मतदान होताच त्यांनी विरोधीपक्ष नेते पदाचा राजीनामा दिला, तर आज आपली आमदारकीचा राजीनामा देखील दिला आहे. दरम्यान, विखे हे भाजप प्रवेश करणार हे निश्चित आहे, मात्र आज भारत भालके हे देखील त्यांच्यासोबत बैठकीत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सोलापूर जिल्ह्यामध्ये सध्या कॉंग्रेसचे केवळ तीन आमदार आहेत, भालके हे पंढरपूर, सिद्धराम म्ह्नेत्रे अक्कलकोट आणि प्रणिती शिंदे या सोलापूर शहर मध्यच्या कॉंग्रेस आमदार आहेत. एका बाजूला जिल्ह्यात कॉंग्रेसचे पानिपत झाले असताना भारत भालके यांचा भाजप प्रवेश कॉंग्रेसला मोठे नुकसान पोहचवणारा असणारा आहे. विशेष म्हणजे २००९ मध्ये भालके हे माजी खा विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासाठी जायंट किलीर ठरले होते.

हे आमदार करू शकतात राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत भाजप प्रवेश

  • भारत भालके
  • जयकुमार गोरे
  • अब्दुल सत्तार
  • सुनील केदार
  • गोपाळदास अग्रवाल
  • नारायण पाटील