विठ्ठलाच्या दारातील ‘देव माणूस’, भारत भालकेंकडून दुमजली बंगला क्वारंटाईनसाठी जाहीर

bharat bhalake

पंढरपूर : निगेटिव्ह अहवालानंतर कराड येथून रुकडीत परतणाऱ्या विद्यार्थ्याला खासदार धैर्यशील माने यांनी स्वत:चं घर देवून ‘आपुलकी गृह’ या कोल्हापुरी पॅटर्नची सुरुवात स्वत:पासून आज केली. आपुलकी गृहाच्या माध्यमातून गावातील भाऊबंदकीतील कडवटपणा संपवून बंधूभाव वाढीस लागेल हा संदेश या निमित्ताने खासदार माने यांनी दिला. प्रत्यक्ष कृतीतून स्वत:चं घर देणारे देशातील पहिले खासदार असतील. त्यानंतर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पंढरपूर येथील आमदार भारत भालके हे देखील पुढे आले आहेत.

सोलापूरनंतर आता पंढरपुरातही कोरोनाने शिरकाव केला असून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर पंढरपूरचे आमदार भारत भालके यांनी जिल्हा न्यायालयाजवळ असलेला त्यांचा दुमजली बंगला क्वारंटाईनसाठी देणार असल्याचं जाहीर केले आहे. तसे पत्र त्यांनी प्रशासनाला दिले आहे.

कौतुकास्पद : शिवसेनेचा ‘हा’ खासदार ठरला क्वारंटीनसाठी स्वत:चे घर देणारा देशातील पहिले खासदार

कोरोनाचा वाढता धोका पाहाता, आमदार भारत भालके यांनी आज आपला राहता बंगला लोकांसाठी खाली करुन देणार असल्याचे जाहीर केले. या दुमजली बंगल्यामध्ये जवळपास 100 हून अधिक बेड बसतील. यासाठी लागणारे सर्व साहित्य देखील आपण उपलब्ध करुन देणार आहे. या ठिकाणी अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांसाठी देखील सोय केली जाईल, असंही भालके यांनी सांगितलं.

शेती विषयक कामे सुरु ठेवण्यास कोणतीही अडचण येणार नाही – विश्वजीत कदम