fbpx

आमदार भारत भालके यांच्याकडुन काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबाला एक लाखाची रोख मदत

कुर्डूवाडी प्रतिनीधी/हर्षल बागल : महाराष्ट्रात मराठा आंदोलनात औरंगाबाद येथे जलसमाधी घेतलेले स्व.काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबाला आधार म्हणुन पंढरपुर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार भारत भालके यांनी निवासस्थानी जाऊन रोख एक लाखाची मदत केली.

सुप्रिया सुळेंच्या सभेकडे गावकऱ्यांनी फिरवली पाठ; सरपंचासह मोजक्या कर्यकर्त्यांची उपस्थिती

भारत भालके हे पंढरपुर मंगळवेढा मतदार संघातुन सलग दोन वेळा विधानसभेवक निवडुन गेले आहेत. अतिशय गरिबीतुन दिवस काढल्यानंतर साखर कारखान्यातील एक कामगार ते पंढरपुरचा आमदार असा थक्क करणारा संघर्षमय प्रवास भालके यांनी केला आहे. पंढरपुर तावुक्यातील सरकोली हे त्यांचे मुळ गाव आहे. आजही त्यांचा व्यावसाय शेतीचं आहे.

भावानो स्वतःचा जीव देऊ नका रे, आई वडिलांच्या चेहरा समोर ठेवा – पंकजा मुंडे

काय आहेत नेमक्या मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या 
-मराठा समाजाला त्वरीत आरक्षण द्यावे.
मराठा विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कातील ५० टक्के सवलतीची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करा.
राज्य सरकारच्या नोकर भरतीत मराठयांसाठी घोषित केलेल्या १६ टक्के आरक्षणाचा सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात अध्यादेश काढून त्यांचे त्वरीत कायद्यात रूपांतरण करावे.
आण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतंर्गत कर्ज देण्यासाठी बँकांना सक्तीचे आदेश द्यावेत.
मौजे कोपर्डी ता. कर्जत घटनेतील अत्याचार व हत्या करणाऱ्या नराधम आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी.
अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमाच्या तरतुदींचा सर्रास होणारा गैरवापर थांबवावा व योग्य ती दुरुस्ती  करावी.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे.

मराठा क्रांती मोर्चा : आंदोलकांनी शिवेंद्रराजेंना बोलण्यापासून रोखलं