नेवासा तालुक्याला वैभवशील तालुका बनवणार – आमदार बाळासाहेब मुरकुटे

नेवासा / भागवत दाभाडे: नेवासा तालुक्याला वैभवशील तालुका बनवून एक आदर्श तालुका करणार असल्याचे प्रतिपादन आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केले. जेऊर हैबती येेथील विविध विकास कामांच्या उदघाटन प्रसंगी आमदार मुरकुटे बोलत होते. आमदार मुरकुटे यांच्या विशेष प्रयत्नातून पर्यटन विकास अंतर्गत जेऊर ते यमाई माता देवस्थान पर्यंत काँक्रेटिकरन करणे व मंदिराजवळील नदीवर नदीघाट बांधणे अश्या एकूण 64,53,323 रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या हस्ते करण्यात आला आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाबासाहेब म्हस्के होते. प्रास्तविक रामदास खराडे यांनी केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य दत्तुभाऊ काळे, पंचायत समिती सदस्य अजित मुरकुटे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सतीश कर्डीले, अंकुश काळे, वसंत गरड,खराडे सर, आदींनी मनोगत व्यक्त केले.

आमदार मुरकुटे म्हणाले कि नेवासा तालुका हा वैभवशील तालुका करून राज्यात एक आदर्श असा तालुका करायचा आहे. तालुक्यात तीर्थ क्षेत्र व पर्यटन विकास अंतर्गत तालुक्यातील देवस्थानांचा विकास करणार आहे व वरखेड, जेऊर आणि माका या देवस्थनांना जोडणाऱ्या रस्त्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली आहे. लवकरच निधी उपलब्ध होणार आहे आणि 60 कोटीचा हा रस्ता असून जिल्ह्यातील एक आदर्श रस्ता होणार असल्याची माहिती आमदार मुरकुटे यांनी दिली.

Loading...

तसेच नेवासा तालुका हा अध्यात्मिक तालुका आहे म्हणून तिर्थक्षेत्रांचा विकास करणे हे माझे कर्तव्य आहे व असल्याचे सांगितले. विरोधकांनी खोटे आरोप बंद करावे आणि तुमचे पाच वर्षातील कामे व माझे तीन वर्षातील कामे जनतेसमोर आहे. निवडणुकींपेक्षा विकास कामे महत्वाचे असल्याचेही आमदार मुरकुटे यांनी सांगितले. ग्रामस्थांनी मंजूर झालेल्या विकास कामाबद्दल आमदार मुरकुटे यांचे आभार मानले .

यावेळी अभियंता, नरसाळे साहेब ,शरद गरड, राजेंद्र म्हस्के, दौलत देशमुख, भाऊसाहेब फोलने, बाळासाहेब रिंधे, बाबासाहेब खराडे , कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले शरद जाधव, रावसाहेब खराडे, कृष्णा उगले, अशोक खराडे, प्रकाश मिसाळ,कारभारी ताके, सुभाष औटी, हरिभाऊ गवारे व , आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
मलाही बेळगाव पोलिसांनी मारहण केली होती : शरद पवार
सचिन सावंत संभाजी भिडेंवर बरसले, म्हणतात...
मोठी बातमी : महाविकास आघाडीचं बिनसलं, कॉंग्रेस-राष्ट्रवादी आमने सामने
पाच वर्ष सरकार चालवायचं आहे लक्षात ठेवा;शरद पवारांचा संजय राऊतांना सूचक इशारा
रावसाहेब दानवेंचे जावई मनसेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव राज ठाकरेंच्या भेटीला
रोहित पवार.... नाव तर ऐकलच असेल, पवारंनी लावला थेट मोदींना फोन
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र आहे म्हणणाऱ्या सुळेंवर निलेश राणेंनी डागली तोफ