मुळा’ला २५०० रुपये भाव द्यावाच लागेल – आमदार बाळासाहेब मुरकुटे

आमच्या गाड्याच्या काचा काळ्या नसून भेटायला मध्यस्तीची गरज नाही;मुरकुटे यांचा विरोधकांवर निशाना

नेवासा: ज्ञानेश्वर कारखान्याने पहिली उचल २५०० रुपये दिली असताना मुळा साखर कारखान्याने मात्र २३०० रुपये भाव घोषित केला. त्यांची शेतकऱ्यांना योग्य भाव देण्याची दानतच नाही. आता ज्ञानेश्वर कारखान्याने कमी भाव द्यावा यासाठी ते दबाव आणत आहे. मुळा ला कोणत्याही परिस्थिती २५०० रुपय भाव द्यावाच लागेल असे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी दिघी येथे सांगितले.

नेवासा तालुक्यातील दिघी येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी आमदार मुरकुटे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामभाऊ औताडे होते. यावेळी जि. प. सदस्य दत्तात्रय काळे, पं. स.सदस्य अजित मुरकुटे उपसरपंच दादासाहेब निकम आदी उपस्थित होते.आमदार मुरकुटे म्हणाले की, अंतिम भाव वेगळा आहे, मागील वर्षी राज्यात ३००० हजार ४०० रुपये सर्वात जास्त भाव निघाला होता. मात्र येथील कारखान्याने केवळ २०००हजार ३०० रुपये भाव दिला. त्यांच्या अशा पापांमुळे जनतेने त्यांना घरी बसवले. माजी आमदारांचा पाच वर्षांचा कारभार व माझा तीन वर्षांचा कारभार जनतेसमोर आहे व आमच्या गाड्याच्या काचा काळ्या नसून भेटायला मध्यस्तीची गरज नाही, मी तालुक्यातील जनतेचा सर्वसामान्य आमदार आहे अशी टीका आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केली

You might also like
Comments
Loading...