fbpx

शेतकऱ्यांच्या नावाखाली पीकविमा कंपन्यांनी धंदा मांडून ठेवलाय – बच्चू कडू

टीम महाराष्ट्र देशा : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून आमदार बच्चू कडू यांनी पीकविमा कंपन्यांवर निशाणा साधला. शेतकऱ्यांच्या नावाखाली पीकविमा कंपन्यांनी धंदा मांडून ठेवलाय. कंपन्यांना नफा मिळावा म्हणून अधिकारी मॅनेज केले जात आहेत, अशी टीका बच्चू कडू यांनी केली.

शेतकऱ्यांच्या नावाखाली पीकविमा कंपन्यांनी धंदा मांडून ठेवलाय. कंपन्यांना नफा मिळावा म्हणून अधिकारी मॅनेज केले जात आहेत. सध्या पीकविम्याच्या नावाखाली राज्यभर गोंधळ सुरू आहे. कंपन्यांची कार्यालये नाहीत. त्यांचा माणूस कोण आहे हे लवकर कळत नाही. असे बच्चू कडू यांनी म्हंटले. ‘

इतकेच नव्हे तर, अधिकारी देखील शेतकऱ्यांना भेटत नाही. अशा अधिकाऱ्यांना निलंबित केले पाहिजे, अशी मागणीही आमदार बच्चू कडू यांनी केली. याचबरोबर, दुष्काळ असताना राज्यकर्ते मात्र ढिम्म आहेत त्यांनी त्वरीत सकारात्मक पावले उचलणं गरजेचं आहे, असेही त्यांनी म्हंटले.