मी भाजप सोडणार असल्याच्या कपोलकल्पित बातमीत सुईच्या टोकाइतकेही तथ्य नाही – पाचपुते

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकी आधी मेगाभरतीचा अनुभव घेतल्यानंतर भाजपला आता मेगागळतीचा अनुभवही घेता येणार आहे. कारण कॉंगेस – राष्ट्रवादीमधून पक्षांतर करून आलेले आमदार आता पुन्हा घरवापसी करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे सत्तापालट होताचं भाजपला मोठा धक्का बसणार असल्याचं बोललं जात आहे.

भाजपमध्ये दाखल झालेले आणि भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले सुमारे डझनभर आमदार राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या गोटातून करण्यात आला आहे. पक्ष बदलण्याचे टायमिंग चुकलेल्या या आमदारांची राजीनामे देण्याची तयारी असून ते तिन्ही पक्षनेत्यांच्या संमतीची प्रतीक्षा करीत असल्याचे समजते. भाजपच्या या आमदारांमध्ये मराठवाड्यातील ३, पश्चिम महाराष्ट्रातील पाच आमदारांचा समावेश असून आणखी चार आमदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात आले आहे.

Loading...

यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि जेष्ठ नेते बबनराव पाचपुते हे देखील भाजपला रामराम ठोकणार असल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र पाचपुते यांनी या सगळ्या बातम्यांचे खंडन केले आहे.

काही माध्यम संस्थांकडून मी भारतीय जनता पक्ष सोडणार असल्याच्या कपोलकल्पित बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. या बातम्यांमध्ये सुईच्या टोकाइतकेही तथ्य नसून माझा आमचे नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे. संभ्रम निर्माण करणे, हाच बातमीच्या सूत्रांचा उद्देश आहे. अस स्पष्टीकरण बबनराव पाचपुते यांनी दिले आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्यात महायुतीची वर्चस्व असल्याने अनेक कॉंग्रेस – राष्ट्रवादीच्या आमदारांनी भाजपमध्ये पक्षांतर केले. या नेत्यांना भाजपने ही मोठ्या मनाने स्वीकारले. या नेत्यांना आमदारकीची तिकीट देखील देण्यात आली. यातील काही आमदार निवडणुकीत निवडूनही आले. मात्र सत्तेची फळ चाखायला गेलेल्या या आमदारांवर सत्तासंघार्षाने आणि नव्याने स्थापन झालेल्या महाविकासआघाडीने चांगलाचं घाला घातला. त्यामुळे आता हे आमदार पुन्हा घरवापसी करण्याच्या तयारीत असल्याचं सांगण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
लोकप्रियतेत ‘तान्हाजी’चाच जयजयकार, अजय देवगन बनला नंबर 1 बॉलीवूड स्टार !!!
यापेक्षा अधिक लोक तर गुरूद्वारामध्ये रोज लंगरमध्ये जेवतात, तेही मोफत
राजकीय पक्षांचा कोणताही बंद महाराष्ट्रातील व्यापारी यापुढे पाळणार नाहीत
शिवसेनेबाबतच्या 'त्या' वक्तव्यामुळे टीकेचे धनी झालेले चव्हाण आता म्हणतात...
वारकरी संतापले ; उद्धव ठाकरे तुम्ही आषाढी एकादशीला शरद पवारांचाच अभिषेक करा
दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
दिल्लीत मोठ्या थाटात प्रचाराला गेलेल्या तावडेंना केजारीवालांनी बेक्कार झापलं
'शाहीनबाग आंदोलनातील बहुतांश लोक हे पाकिस्तानी आणि बांगलादेशी'
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...