नाराज भाजप आमदार आशिष देशमुख यांनी घेतली अशोक चव्हाण यांची भेट

BJP-MLA-Ashish-Deshmukh met ashok chavhan

टीम महाराष्ट्र देशा- काटोलचे नाराज भाजप आमदार आशिष देशमुख यांनी मंगळवारी रात्री दिल्लीत काँग्र्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत वडील माजी मंत्री रणजित देशमुख हेही उपस्थित होते. या बैठकीत आशिष यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबत चर्चा झाली की नाही हे जरी गुलदस्त्यात असले तरी लवकर देशमुख कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मागील काही दिवसांपासून आशिष देशमुख उघडपणे भाजपा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत आहेत. सरकारच्या शेतकरी धोरणाविरोधात ते काटोल येथे उपोषणालाही बसले होते. देशमुख हे भाजपमध्ये अस्वस्थ असून ते सातत्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या भेटी घेत आहेत . मंगळवारी रात्री चव्हाण यांच्याशी झालेली भेट त्याच्याच एक भाग होती.

एका वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, नागपुरातील दिल्लीवारीवर असलेल्या काँग्रेस नेत्यांना याभेटीचे साक्षीदार होता आले. त्यामुळे ही गुप्त भेट उजेडात आली. याबाबत आशिष देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता ते फोनवर उपलब्ध होऊ शकले नाही.Loading…
Loading...