‘नाचता येईना अंगण वाकडे’,गोटे म्हणतात भाजपचा विजय ईव्हीएममुळे

टीम महाराष्ट्र देशा – भाजप आमदार अनिल गोटे यांनी बंडखोरी करूनही धुळे महानगरपालिकेत भाजपने विरोधी पक्षांची धुळधाण करत बहुमत सिद्ध केले आहे. भाजपने एकहाती विजय मिळवला आहे.पराभव जिव्हारी लागलेल्या आमदार अनिल गोटे यांनी पराभवाचे खापर चक्क ईव्हीएम फोडले.

गिरीश महाजनांना गुंड सांभाळायची सवय आहे, त्यामुळे मी बोलण त्यांना विनोदच वाटणार हे सहाजिक आहे. लोकांना हाताशी धरुन इव्हीएम मशिन मॅनेज करुन त्यांनी हा विजय मिळवला असा दावा त्यांनी केला आहे. किती इव्हीएम मॅनेज करणार आहोत याच नियोजन त्यांनी आधीच केलं होतं. धुळ्यातल्या भाजपाच्या विजयाला काल पैशाचा केलेला वापर कारणीभूत ठरला. त्यामुळे ही निवडणूक नाही तर धुळेकरांची फसवणूक आहे, असा थेट आरोप गोटे यांनी केला आहे.

मुंडे साहेब दिलदार होते फडणवीस विश्वासघातकी, गोटेंचा हल्लाबोल !

शरद पवार यांच्यावरही गुन्हा दाखल करा; भाजप आमदार अनिल गोटे यांची मागणी

असा नरपुंग गेल्या दहा हजार वर्षात झाला नाही; आ अनिल गोटेंचे पवारांवरील व्हायरल झालेले पत्र