आमदार अनिल गोटेंचा राजीनामा, उद्या करणार उमेदवारी अर्ज दाखल

टीम महाराष्ट्र देशा : अखेर भाजपचे नाराज आमदार अनिल गोटे यांनी आज आपल्या आमदारकीचा राजीनामा देत भाजपला राम राम ठोकला आहे. तर आता अनिल गोटे हे केंद्रीय राज्यमंत्री  डॉ सुभाष भामरे यांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढवणार आहेत.

अनिल गोटे हे मागील काही दिवसांपासुन भाजप नेत्यांवर नाराज होते. तसेच धुळे महानगरपालिका निवडणुकीत गोटे यांनी भाजप विरोधात आघाडी स्थापन करत निवडणूक लढवली होती. आता देखील गोटे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत डॉ. सुभाष भामरे यांच्या विरोधात बंड पुकारले आहे. अनिल गोटे उद्या आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

त्यामुळे धुळे मतदारसंघात भामरे-गोटे-काँग्रेसचे कुणाल पाटील पाटील अशी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. आमदारकीचा राजीनामा देतेवेळी त्यांनी आपण अजूनही मोदींच्या विचारांशी सहमत आहोत परंतु मोदींच्या नावाने वाईट उद्योग करणाऱ्यांच्या आपण विरोधात आहोत अस मत व्यक्त केले आहे. तसेच त्यांनी गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

दरम्यान, अनिल गोटे यांनी ३० वर्षापूर्वीची शत्रुत्व विसरत शरद पवार यांची भेट घेतली होती. पण आता अखेर अनिल गोटे यांनी अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचा निर्णय घेतला आहे.