मुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तीन तास झालेल्या चर्चेनंतर आ.अनिल गोटेंचे राजीनामास्त्र म्यान

anil-gote

टीम महाराष्ट्र देशा- पक्षामध्ये गुन्हेगारांना प्रवेश द्यायचा नाही व धुळे महापालिका निवडणूक आपल्या नेतृत्वाखाली लढल्या जाव्यात या दोन अटींवर आपण राजीनामा मागे घेतल्याचे आमदार अनिल गोटे यांनी जाहीर केले आहे.

मुख्यमंत्र्यांशी सुमारे सव्वातीन तास झालेल्या चर्चेत आपल्या दोन अटी मान्य केल्यामुळे राजीनामा मागे घेतल्याचे त्यांनी सांगितले. संरक्षणमंत्री सुभाष भामरे, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर गंभीर आरोप करत गोटे यांनी राजीनामा दिला होता. पंरतु, जर पक्षाने दगाफटका केला तर त्याचे गंभीर परिणाम त्यांना भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

भाजपमध्ये गुंडांना प्रवेश दिल्याच्या मुद्द्यावर अनिल गोटेंनी शरसंधान साधलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अपमान करणाऱ्या लोकांना पक्षात स्थान दिले जात असल्याबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. आपण धुळ्याच्या महापौरपदाची निवडणूक लढवणार असल्याबाबत धुळ्यातील शिवतीर्थ चौकातील जाहीर सभेत स्वत: अनिल गोटे यांनी सांगितलं होतं.

कॉंग्रेसला धक्का,अल्पसंख्यांक विभागाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षांचा राजीनामा,राष्ट्रवादीत करणार प्रवेश

काँग्रेस आणि राष्ट्रवादीला धक्का ; ११ नेत्यांचा भाजपात प्रवेश

भाजपकडून प्रतिसाद न मिळाल्यास शिवसंग्राम स्वबळावर लढणार?