आमदार अनिल भोसले यांचा ठिय्या आंदोलनाला जाहीर पाठींबा

टीम महाराष्ट्र देशा : सध्या महाराष्ट्रात मराठा क्रांती मोर्चाचे वादळ घोंगावत असून, तब्बल ५७ मूक मोर्च्यांनंतर सुरु झालेले हे ठोक मोर्चे आता हिंसक होत आहेत. सत्ताधाऱ्यांची बेताल वक्तव्ये, मोर्चेकऱ्यांवर दाखल होणारे खोटे गुन्हे यामुळे वातावरण अधिक चिघळत होते. त्यामुळे मराठा समाजाकडून आता आमदार खासदारांच्या घरासमोर ठिय्या आंदोलने करण्यात येत आहेत.  आज या आंदोलकांनी आमदार अनिल भोसले यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी प्रस्ताव स्वीकारण्यासाठी आल्यावर त्यांनी ठिय्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देऊन मृतांच्या कुटुंबातील लोकांना मदत करावी व त्यांना नोकरी द्यायला हवी व मराठा समाजातील बांधवांनी आत्महत्या करू नये. तसेच राज्यातील सर्व नेते मंडळींनी एकत्र येवून एक विचाराने आरक्षण द्यायला हवे. तसेच याची राजकीय पोळी भाजू नये असे अहवान भोसले यांनी केले.

काय आहेत नेमक्या मराठा समाजाच्या प्रलंबित प्रमुख मागण्या :

  • मराठा समाजाला त्वरीत आरक्षण द्यावे.
  • मराठा विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कातील ५० टक्के सवलतीची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करा.
  • राज्य सरकारच्या नोकर भरतीत मराठयांसाठी घोषित केलेल्या १६ टक्के आरक्षणाचा सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात अध्यादेश काढून त्यांचे त्वरीत कायद्यात रूपांतरण करावे.
  • आण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतंर्गत कर्ज देण्यासाठी बँकांना सक्तीचे आदेश द्यावेत.
  • मौजे कोपर्डी ता. कर्जत घटनेतील अत्याचार व हत्या करणाऱ्या नराधम आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी.
  • अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमाच्या तरतुदींचा सर्रास होणारा गैरवापर थांबवावा व योग्य ती दुरुस्ती करावी.
  • अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे.

मनसेच्या खळकट्याक आंदोलनाला यश, मल्टिफ्लेक्समध्ये आज पासून बिनदास्त घेऊन जा खाद्यपदार्थ

प्लॅस्टिकबंदीसाठी जनजागृती करा ! आदित्य ठाकरेंचे नगरसेवकांना आवाहन