fbpx

लोकसभेच्या निकालाची चिंता सोडा, नव्या जोमाने कामाला लागा : अमित देशमुख

टीम महाराष्ट्र देशा- सत्ताधाऱ्यांनी गेल्या पाच वर्षात लातूरच्या पाणी प्रश्नासह जनसामान्यांच्या मुलभूत प्रश्नावर काय केलं, असा प्रश्न लातूरचे आमदार अमित देशमुख यांनी विचारला आहे. ते काल लातूर शहर विधानसभा मतदार संघातल्या काँग्रेस पक्षाच्या विविध सेलच्या पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते.

लातूरला कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था एक ऑगस्टपर्यंत करण्याचं आश्वासन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं, जिल्हा नियोजन समिती बैठकीत ३१ जुलैपर्यंत लातूरला कायस्वरूपी पाणी पुरवठ्याची योजना कार्यान्वित होईल असं आश्वासन दिलं होतं, मात्र आता पुन्हा एकदा रेल्वेद्वारे लातूरला पाणी पुरवठ्याचा विचार सत्ताधारी करत आहेत, याकडे देशमुख यांनी लक्ष वेधलं.

दरम्यान, लोकसभेच्या निकालाची चिंता न करता, कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने कामाला लागावं, असं आवाहनही आमदार देशमुख यांनी केलं. यावेळी काँग्रेस पक्षाच्या विविध सेलचे पदाधिकारी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या