fbpx

आश्वासने आणि स्वप्नरंजन खूप झाली आता लातूरकरांना पाणी हवे – अमित देशमुख

टीम महाराष्ट्र देशा :  सरकारी आश्वासने आणि स्वप्नरंजन खूप झाले आता लातूरकरांना पाणी हवे, असे लातूरचे आमदार अमित देशमुख यांनी म्हंटले. आजच्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात ते बोलत होते.

राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाचा आज दुसरा दिवस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. दरम्यान, चार वर्षापसून लातूर जिल्ह्यातील जनता दुष्काळाच्या संकटात सापडली आहे. रेल्वेने पाणी आणण्याचा अनुभव झाल्यांनतर वॉटरग्रीडचे स्वप्न दाखवले जात आहे. मात्र, वॉटरग्रीड संकल्पनेची प्रत्यक्षात अमलबजावणी व्हावी. ही फक्त निवडणुकीची घोषणा ठरू नयेत. त्यामुळे, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून फक्त घोषणाबाजी नको, प्रत्यक्षात पाणी हवे आहे, असे अमित देशमुख यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१६ मध्ये दुष्काळग्रस्त लातूरच्या दौऱ्यावर अल्यानंतर नियमित पाणी पुरवठा होईल असे आश्वासन दिले होते. मात्र, आजही लातूरकरांना महिन्यातून केवळ दोन वेळा पाणी मिळते. असे देशमुख यांनी म्हंटले. तसेच, मुख्यमंत्री फडणवीस यांनी अमृतयोजनेचे काम महिन्याभरात पूर्ण होईल असे आश्वासन दिले असलेतरीही मुख्यमंत्र्यांनी उजणीच्या पाण्याबाबत मात्र मौन बाळगले आहे, असेही देशमुख यांनी म्हंटले.