शिवसेनेचे हिंदुत्त्व धर्माशी नाही तर भारत मातेशी जोडलेले-आमदार अंबादास दानवे

Ambadas Danve

औरंगाबाद : शिवसेना ही हिंदूत्त्वादी असली तरी शिवसेनेचे हिंदुत्त्व हे कोणत्याही धर्माशी जोडलेले नाही. तर शिवसेनेचे हिंदुत्त्व हे भारत मातेशी जोडलेले असल्याचे मत शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी व्यक्त केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेच्या हिंदुत्त्वाच्या मुद्यावर भाजपच्या वतीने वारंवार टीका होत असताना आमदार दानवे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त औरंगाबाद जिल्ह्यात शिवसंपर्क अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानादरम्यान शिवसेना पक्ष वाढीसाठी प्रयत्न करत आहे. यामध्ये विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांना शिवसेनेत प्रवेश दिला जात आहे. त्याच अंतर्गत विविध पक्षातील मुस्लिम कार्यकर्त्यांनी दानवे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या निमित्त दानवे यांनी भाजप आणि इतर विरोधी पक्षांना प्रत्युत्तर दिले आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेने हिंदुत्त्वाचा मुद्दा बाजूला ठेवला असल्याचा आरोप करण्यात आला होता. भाजपच्या नेत्यांच्या वतीनेही वारंवार शिवसेनेवर हिंदुत्त्वाच्या मुद्यावरुन टीका होत आहे. मात्र, आमचे हिंदुत्त्व हे भारत मातेशी जोडलेले असल्याचे सांगत दानवे यांनी विरोधकांना उत्तर दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP