मनपा निवडणूक डोळ्यासमोर ठेवत आमदार अंबादास दानवेंचा उद्घाटनाचा सपाटा

औरंगाबाद : शिवसेना जिल्हाप्रमुख तथा औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार अंबादास दानवेंनी महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात सिमेंट रस्त्यासह विविध विकास कामांच्या उद्घाटनाचा सपाटा लावला आहे. मनपा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेची ही उद्घाटन डिप्लोमसी सुरू झाल्याची चर्चा शहरात होतेय.

औरंगाबाद महानगर पालिका निवडणुका कधी होणार याची उत्सुकता दिसून येतेय. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी ९ मार्च रोजी होणार आहे. त्यामुळे ९ मार्च नंतरच निवडणुका कधी होतील, याचा अंदाज लावला जावू शकतो. मात्र, त्या निवडणुकांची तयारी शिवसेनेने सुरू केल्याचं दिसून येतय. त्याचच एक भाग म्हणून हा उद्घाटन कार्यक्रमांचा सपाटा दिसून येतोय. शिवसेना तसेच इतर पक्षाच्या पारंपारीक वार्डामध्ये ही सर्व उद्घाटने होत आहेत. या वार्डनिहाय विकास कामांच्या उद्घाटनातून सामान्य मतदार पुन्हा शिवसेनेकडे राहावा तसेच जुन्या मतदारांवर विकास कामे होत असल्याचा प्रभाव पडवा याचा प्रयत्न या माध्यमातून सुरू आहे. या दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री सुभाष देसार्इ, नगररचना मंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील औरंगाबाद शहरामध्ये विविध विकास कामांचे उद्घाटन केले आहेत.

याचा पुढील भाग म्हणून औरंगाबाद शहरातील पूर्व, पश्चिम तसेच मध्य विभानसभा मतदार संघामधील शिवसेनेच्या वार्डामध्ये फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच विकास कामांचे उद्घाटन झाले आहेत. शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी निवडणुकीच्या कामाला लागले असल्याचे एकंदरीत चित्र औरंगाबादकरांना पहावयास मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या :