मराठा आरक्षणासाठी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाची आमदार अंबादास दानवेंनी घेतली भेट

MLA Ambadas Danve met a youth who was trying to commit suicide for Maratha reservation

औरंगाबाद : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिवाजीनगर येथील दत्ता भोकरे या तरुणाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या घटनेची माहिती मिळाल्यावर शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी त्याची घाटी रुग्णालयात भेट घेतली.

मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवली जाईल व आपल्याला नोकरी लागेल या आशेवर हा तरुण होता, परंतु न्यायालयाने मराठा आरक्षणावरील सुनावणी दोन आठवडे पुढे ढकलल्याचे कळताच या तरुणाने नैराश्यातून विषप्राशन केले. ही घटना समजताच क्रांती चौक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याला घाटी रुग्णालयात दाखल केले होते. सध्या या तरुणाची प्रकृती स्थिर असून आमदार अंबादास दानवे यांनी घाटी रुग्णालयात त्याची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली.

यावेळी आमदार अंबादास दानवे यांनी मराठा आरक्षणाची ही कायदेशीर लढाई आहे, राज्य सरकार भक्कमपणे आपली बाजू मांडत असून आरक्षणाबाबत योग्य तो निर्णय लवकरच होईल; मात्र मराठा तरुणांनी अशाप्रकारे टोकाचे पाऊल उचलून आपला जीव धोक्यात घालू नये, असे सांगितले. तरुणांनी संयम बाळगण्याची आवश्यकता आहे. आपण जिवंत असणं हे स्वतःसाठी व आपल्या परिवारासाठी अत्यंत आवश्यक आहे, असेही आमदार दानवे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या