VIDEO: दुष्काळावर चर्चा करताना आमदारांना अश्रू अनावर

मुंबई: पावसाळ्याला सुरुवात होवून दोन महिने उलटले तरी अजूनही मराठवाडा तसेच महाराष्ट्रातील इतर भागात पावसाने पाठ फिरवली आहे. गेली ४२ दिवस झाले मराठवाड्यात पावसाने उघडीप दिल्याने. शेतकऱ्यांनी पेरलेले सोयाबीन, उडीद आणि इतर पिके जळून जात आहेत.

गेल्या ४२ दिवसापासून मराठवाड्यात पावसाचा थेंब नाही, मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी आमदार अमरसिंह पंडित यांनी सभागृहात चर्चा उपस्थित केली परंतु वेळ न मिळाल्यामुळे बोलताना ते खूप भावुक झाले. त्यामुळे पुढे त्यांची हि चर्चा विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी पुढे चालू ठेवून मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी सरकारला केली…

आज हाच मुद्दा विधानपरिषदेत मांडत विरोधीपक्ष नेते धनंजय मुंढे यांनी मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. ‘गेल्या ४२ दिवसांपासून मराठवाड्यात पाउस झाला नसून शेतकऱ्यांनी पेरलेली सर्वच पिके जळून चालली आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा मराठवाडा आणि विदर्भातला शेतकरी उघड्यावर आला असून सरकारने त्यांना दिलासा द्यावा’ असे म्हणत धनंजय मुंढे यांनी मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली.

बघा नेमक काय झाल विधिमंडळात