मुंबई : शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर पक्षाला गळती लागली. अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी एकनाथ शिंदे गटाकडे वळले. त्यामुळे आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे हे पक्ष बांधणीला लागले आहेत. आदित्य ठाकरे शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात, तसेच बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात जाऊन सहभाग घेत आहेत. या यात्रेदरम्यान ते बंडखोर आमदारांवर कडाडून टीका करताना दिसत आहेत. त्याचबरोबर त्यांनी बंडखोर आमदारांना राजीनामे देऊन पुन्हा निवडणुकीला सामोरे जा असे, आव्हान देखील दिले आहे. आदित्य ठाकरे यांच्या या आव्हानाला आता एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी उत्तर दिले आहे.
शिवसेनेतील खासदार संजय राऊत यांच्यासह आदित्य ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून पक्ष उभारणीच्या कामाला लागले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी नंतर पक्षातील तब्बल ४० आमदार फुटल्याने शिवसेनेची ताकद कमी झाली असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता पक्षाला पुन्हा मजबूत बनवण्यासाठी पक्षप्रमुखांसह इतर नेते जनतेशी संवाद साधत आहेत. यादरम्यान शिवसेना नेमकी कोणाची? धनुष्यबाण कोणाकडे जाणार? यासाठीही संघर्ष सुरूच आहे. या प्रकरणात आता निवडणूक आयोगच निर्णय घेणार आहे.
दरम्यान आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांना राजीनामे देऊन पुन्हा निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले होते. त्यावर अब्दुल सत्तार म्हणाले की, ‘राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवायला तयार आहोत. फक्त शिंदे साहेबांनी परवानगी द्यावी. मग कळेल कोण गद्दार आणि काय निष्ठा असते. माझी मातोश्रीवर जायची इच्छा नाही. आदित्य ठाकरे यांना विनंती करतो की त्यांनी माझ्या मतदार संघात यावे. याआधी आला नव्हतात पण आता या, असे आवाहनच अब्दुल सत्तार यांनी केले आहे.
भिवंडी येथील दौऱ्यात आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर कडाडून टीका केली होती. ‘शिवसैनिकांची गर्दी हेच आमचं यश आहे. हे जे काही सुरु आहे ते क्लिष्ट आहे. ज्यांना आपण ओळख दिली, मंत्रिपद दिलं ते आपल्याला सोडून गेले. ते योग्य आहे का? त्यांनी गद्दारी केली ते योग्य आहे का? राजकारणाची पातळी सोडायची नसते. ही माणूसकीशी झालेली गद्दारी आहे. मी लहानपणापासून ज्यांना पाहतोय, त्यांनी आज पाठीत खंजीर खुपसले. मात्र, कुठेही आपली शिवसेना हललेली नाही, ज्यांना अपचन झालं आहे तेच हललेत. त्यांच्यावर विश्वास टाकला, पण तुमच्यावर अन्याय झाला आणि तेच आता निष्ठावाण म्हणून पुढे येत आहेत. राजकारण जमले नाही म्हणून आज हे दिवस आले आहेत.’ असे आदित्य ठाकरे म्हणाले होते.
महात्वाच्या बातम्या :
- Uddhav Thackeray : बंडखोरांनी आपल्या आईवडिलांना सोबत घेऊन मत मागवीत, पण हे माझे वडीलही चोरायला निघालेत – उद्धव ठाकरे
- Uddhav Thackeray : “हे बंडखोर नाहीत तर हरामखोर आहेत, नमकहराम आहेत”; उद्धव ठाकरे यांचा बंडखोरांवर हल्लाबोल
- Sanjay Raut : “…हा तर खोटारडेपणाचा कळस”, संजय राऊतांचा भाजपच्या ‘या’ नेत्यावर पलटवार
- MNS : ‘अब राजा का बेटा राजा नही बनेगा राजा वही बनेगा जो हकदार होगा!’ ; मनसे नेत्याचं सूचक ट्विट
- Chandrakant Patil : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मातृशोक
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<