मोदींना देश भगवा करायचा म्हणून त्यांनी भारतीय संघाची जर्सी भगवी केली – अबू आझमी

टीम महाराष्ट्र देशा : भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीचा रंग बदलून भगवा करण्यात आला आहे, यामुद्यावरून समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. पंतप्रधान मोदींना देश भगवा करायचा आहे त्यामुळेच त्यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीचा रंग बदलून भगवा केला आहे, असा आरोप अबू आझमी यांनी केला.

आयसीसीच्या नियमानुसार भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीचा रंग बदलून भगवा करण्यात आला आहे. भारत विरुद्ध इंग्लंड या सामान्या दरम्यान भारतीय संघ भगव्या रंगाची जर्सी परिधान करून मैदानात उतरणार आहे. दरम्यान समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी यांनी यावर आक्षेप घेतला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना देश भगवा करायचा आहे, त्यामुळेच भारतीय क्रिकेट संघाची जर्सी भगवी करण्यात आली आहे. देशाच्या तिरंग्यात मुस्लिमांचा हिरवा रंग देखील आहे. त्यासोबत आणखी रंग आहेत. मग भारतीय संघाच्या जर्सीसाठी भगवाच रंग का? असा सवालही त्यांनी केला.