गड आला पण सिंह गेला,तीन मोठ्या राज्यात आघाडी मिळवणाऱ्या काँग्रेसला मिझोरममध्ये मोठा धक्का

एझोल : ईशान्येतील सेव्हन-सिस्टर्समधील महत्वाचे असलेल्या मिझोरम विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले आहेत. मिझो नॅशनल फ्रंटला (MNF) 26 जांगासह स्पष्ट बहुमत मिळालं आहे. काँग्रेसला 5 जागांवर आणि भाजपला एका जागेवर समाधान मानावं लागलं आहे. तर 8 अपक्ष उमेदवार याठिकाणी निवडून आले आहेत. तीन मोठ्या राज्यात मोठी आघाडी मिळवणाऱ्या काँग्रेसने आपल्या हातून मिझोरमची सत्ता गमावली आहे.

मिझोरम विधानसभेच्या ४० जागांचे निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आले. एमएनएफने २६ जागाजिंकल्या, तर काँग्रेसचे पाच उमेदवार निवडून आले. भाजपने एक जागा जिंकून खाते उघडले, तर झोराम पिपल्स मूव्हमेंट (झेडपीएम)ने पाच जागा जिंकल्याचे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले. इशान्येकडील सात राज्यांपैकी मिझोरमची सत्ता दहा वर्षे काँग्रेसकडे होती. परंतु पक्षाने तीही गमावली आहे. मतदारांनी काँग्रेसला सत्तेवरून खाली खेचले आहे.

You might also like
Comments
Loading...