पेट्रोल पंपावर पाणी मिश्रित इंधन

औरंगाबाद – औरंगाबाद येथील गोपाल टी येथील पेट्रोल पंपावर पाणी मिश्रित इंधन मिळाल्याने वाहनचालकांनी पंपावर गोंधळ केला आज दुपारी नेहमी प्रमाणे येथील गोपाळ टी समोरील पेट्रोल पंपावर नागरिकांनी पेट्रोल भरले आणि गाडी चालु केल्यावर फायरिंगसह इतर समस्या सुरू झाल्या नंतर गाडयांच्या टाकीत पाहिले असता पेट्रोलमध्ये पाणी अाढळले. त्यामुळे ग्राहकांनी गोंधळ केला,