Share

Winter Skin Care | हिवाळ्यामध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी आंघोळीच्या पाण्यात मिसळा ‘हे’ तेल

टीम महाराष्ट्र देशा: हिवाळा (Winter) येताच त्वचा (Skin) च्या समस्या सुरू व्हायला लागतात. त्यामुळे हिवाळ्यात गरम पाण्याने (Hot Water) अंघोळ (Bath) करणे हे कुठल्याही थेरीपी पेक्षा कमी नसते. त्याचबरोबर स्नायूंना आराम देण्यासाठी गरम पाण्याने अंघोळ करणे खूप चांगले असते. पण गरम पाणी शरीरासाठी कितीही चांगले असले तरी त्वचेवर त्याचे विपरीत परिणाम होऊन त्वचा कोरडी व्हायला लागते. अशा परिस्थितीत तुम्ही गरम पाण्यामध्ये तेल मिसळून आंघोळ करू शकता. आंघोळीच्या पाण्यामध्ये तेल मिसळल्यास त्वच मुलायम होऊन त्वचेवरील कोरडेपणा देखील दूर होऊ शकतो. त्यामुळे आज या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये कोणते तेल मिसळून आंघोळ केल्यास त्वचेचे फायदे होतील याबद्दल माहिती सांगणार आहोत.

खोबरेल तेल

हिवाळ्यामध्ये आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही खोबरेल तेलाचे काही थेंब टाकून त्या पाण्याने आंघोळ करू शकता. आंघोळीच्या पाण्यामध्ये खोबरेल तेल मिसळल्यास त्वचेवरील कोरडेपणाची समस्या नाहीशी होऊ शकते. त्याचबरोबर हिवाळ्यात तुम्ही आंघोळीपूर्वी अंगावर खोबरेल लावून नंतर आंघोळ करू शकता. कारण खोबरेल तेलामध्ये आढळणारे फॅटी ॲसिड आपली त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते.

बदाम तेल

बदामाच्या तेलामध्ये त्वचा दुरुस्ती करण्यासाठी लागणारे गुणधर्म मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे हिवाळ्यात आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही बदामाच्या तेलाचे काही थेंब मिसळून त्या पाण्याने अंघोळ करू शकतात. बदामाचे तेल आंघोळीच्या पाण्यात टाकल्यावर आपली त्वचा मुलायम आणि चमकदार होऊ शकते.

लॅव्हेंडर ऑइल

इसेन्शियल ऑइल हे त्वचेसाठी खूप महत्त्वाचे असते. त्याचबरोबर इसेन्शियल ऑइल आपल्या त्वचेसाठी खूप चांगले असते. त्यामुळे हिवाळ्यामध्ये आंघोळीच्या पाण्यात तुम्ही लॅव्हेंडर ऑइलचा वापर करू शकता. लॅव्हेंडर ऑइल आंघोळीच्या पाण्यात टाकून आंघोळ केल्याने तुमचा मूड चांगला राहून शरीर ताजेतवाने राहते. त्याचबरोबर त्वचेवरची चमक देखील वाटते.

हिवाळा (Winter) मध्ये आंघोळीच्या पाण्यात तेल मिसळताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

  • आंघोळीच्या पाण्यामध्ये कुठलीही तेल मिसळण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा की त्वचेवर कुठलीही दुखापत नाही पाहिजे. जर तुमच्या त्वचेवर दुखापत असेल आणि तरीही तुम्ही आंघोळीच्या पाण्यात तेल घातले तर त्या दुखापत झालेल्या जागेवर जळजळ होऊ शकते. त्यामुळे शरीरावर कुठलीही दुखापत असल्यास आंघोळीच्या पाण्यामध्ये तेलाचा वापर टाळा.
  • तेल आंघोळीच्या पाण्यात मिसळण्यापूर्वी त्वचेवर तेल लावून प्रथम पॅच टेस्ट करा आणि नंतर पाण्यात मिसळा. यामुळे तुम्हाला कळेल की हे तेल तुमच्या त्वचेसाठी फायदेशीर आहे की नाही.
  • अगदी लहान मुलांच्या आंघोळीच्या पाण्यात तेल मिसळणे टाळा. त्या उलट जर तुम्ही गरोदर असाल तर पाण्यात आवश्यक ते तेल मिसळून आंघोळ करा.

टीप : वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या 

टीम महाराष्ट्र देशा: हिवाळा (Winter) येताच त्वचा (Skin) च्या समस्या सुरू व्हायला लागतात. त्यामुळे हिवाळ्यात गरम पाण्याने (Hot Water) अंघोळ …

पुढे वाचा

Health

Join WhatsApp

Join Now