मिथुन चक्रवर्ती यांच्या मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल

नवी दिल्ली : चित्रपट अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा महाअक्षय आणि त्यांची पत्नी योगीता बाली अडचणीत आले आहेत. महाअक्षयवर बलात्कार आणि योगिता बालींवर जबरदस्ती गर्भपाताचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.दिल्लीतल्या रोहिणी कोर्टाने महाअक्षयवर बलात्काराचा आणि योगिता बालींवर फसवणूक आणि गर्भपाताचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

एका भोजपुरी अभिनेत्रीने हे आरोप लावले आहेत. महाअक्षयने लग्न करण्याचं आश्वासन दिलं होतं. लग्नाचं आश्वासन देत त्यानं संबध निर्माण केले. यातूनच ती अभिनेत्री गर्भवती राहिली तेव्हा योगिता बालीने तीला गर्भपात करण्यास भाग पाडलं असा आरोप या अभिनेत्रीनं केला आहे.

रोहिणी कोर्टानं बेहमपूर पोलीस स्टेशनला असे गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. मिथून चक्रवर्ती आणि योगिता बाली यांच्याकडून अद्याप कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही. दरम्यान चित्रपट निर्देशक सुभाष शर्मा यांची मुलगी मदालसा आणि महाअक्षय यांचं लवकरच लग्न होणार आहे.