Mithali Raj- महिला क्रिकेट मध्ये आता मिताली ‘राज’

सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम

ब्रिस्टल- भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज हिने महिला वनडेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम रचला अाहे.मितालीने बुधवारी महिला वर्ल्डकपमध्ये आपल्या १८३ वनडेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ६९ धावांची जिगरबाज खेळी करताना ६,०२८ धावांचा टप्पा गाठला.
 या आधी हा विक्रम शॉर्लेट एडवर्ड हिच्या नावावर होता .तिच्या ५,९९२ धावा होत्या .विशेष म्हणजे वनडेत मितालीच्या नावावर ५ शतके असून या सर्व खेळींत ती नाबाद राहिलेली आहे.ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना सुरु होण्याआधी मिताली या विक्रमापासून ३३ धावा दूर होती. सलामीवीर स्मृती मंधाना या सामन्यातही अपयशी ठरली. अवघ्या ३ धावा काढत स्मृती मंधाना मागे परतल्यामुळे मिताली राजवर डावाची जबाबदारी आली.
आणि भारतीयांच्या अपेक्षांवर योग्य रितीने उतरत मितालीने अर्धशतकी खेळी करत या विक्रमाला गवसणी घातली आहे.
धोनी,सचिनपेक्षा पुढे-
 वनडेत ६ हजार धावांचा टप्पा सचिनने १७० डाव,पाँटिंग व धोनीने १६६ डावांत गाठला होता तर मितालीने ही कामगिरी केवळ १६४ डावांत करून दाखवली.
You might also like
Comments
Loading...