महिला क्रिकेटर्ससाठी आयपीएल सुरु करा – मिताली राज

लंडन- भारतीय महिला क्रिकेटपटुंनी महिला विश्वचषकात अंतिम फेरी गाठून देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. भारताने जरी अंतिम सामना जिंकला नसेल तरी जग भरातील लोकांची माने जिंकली आहेत. भारतात महिला क्रिकेटमध्ये चांगली सुधारणा झाली आहे आणि आता भारतीय महिला कर्णधार मिताली राजचे म्हणणे आहे की भारतात महिलांसाठीची आयपीएल चालू करायला काही हरकत नाही.

“या मुलींनी भारतात आगामी पिढ्यांसाठी खरोखरच मंच तयार केला आहे. त्यांनी भारतातील महिला क्रिकेटचे दरवाजे खुले केले आहेत आणि त्यांना खरोखरच अभिमान वाटला पाहिजे.” मिताली राज म्हणाली.

“महिला क्रिकेटला या विश्वचषकात जो प्रतिसाद मिळाला आहे, त्यामुळे महिला क्रिकेटचे भविष्य उज्वल दिसत आहे आणि आता जर महिला आयपीएल चालू केली तर भारतातीलमहिला क्रिकेटपटूंना प्रोत्साहन मिळेल.” असेही मिताली राज पुढे म्हणाली.