Mithali Raj- मिताली राजचा नवा विश्वविक्रम

भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राज जेव्हा यजमान इंग्लंड संघाविरुद्ध नाणेफेकीला गेली तेव्हा तिने आपल्या नावावर एक विक्रम केला. ३ वेळा विश्वचषकात देशाचं नेतृत्व करणारी मिताली दुसरी कर्णधार ठरली आहे.

यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या बेलिंडा क्लार्कच्या नावावर होता. बेलिंडाने ११८ एकदिवसीय सामने ऑस्ट्रेलियासाठी खेळले होते. १९९७, २००० आणि २००५ अशा ३ विश्वचषकात तिने ऑस्ट्रेलिया संघाचं नेतृत्व केलं आहे.

भारताच्या मिताली राजने यापूर्वी २०१३ आणि २००५ मध्ये भारताचं नेतृत्व विश्वचषकात केलं होत.

हा खास विक्रम होऊ शकतो मितालीच्या नावावर

महिलांच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू बनण्यासाठी मिताली राजला आता फक्त २१२ धावांची गरज आहे. भारत या विश्वचषकात एकूण ७ साखळी सामने खेळणार असल्यामुळे मिताली हा विक्रम आरामात मोडू शकते. सध्या हा विक्रम इंग्लंडच्या चार्लोटते एडवर्ड्सच्या नावावर आहे. तिने १९१ एकदिवसीय सामन्यात ५९९२ धावा केल्या आहेत तर मितालीने १७१ सामन्यात ५७८१ धावा केलेल्या आहेत. मितालीने जर या स्पर्धेत २२० धावा केल्या तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये ६००० धावा करणारी ती पहिली खेळाडू बनेल.