fbpx

मिताली राज ठरली 200 एकदिवसीय सामने खेळणारी पहिली महिला क्रिकेटपटू

टीम महाराष्ट्र देशा- भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज मिताली राज 200 एकदिवसीय सामने खेळणारी पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे.दिनांक 31 जानेवारी 2019 रोजी न्यूझीलँडच्या महिला संघाविरुद्ध खेळल्या गेलेल्या एकदिवसीय (ODI) मालिकेचा तिसरा सामना खेळत भारताची कर्णधार मिताली राज हिने एक जागतिक विक्रम केला आहे.

मिताली राज हिने तिच्या 200व्या एकदिवसीय सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले. एकदिवसीय सामन्यात 200 एकदिवसीय सामने खेळणारी ती प्रथम महिला क्रिकेटपटू ठरली आहे.

36 वर्षीय मिताली राज ही एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा काढणारी फलंदाज देखील आहे. तिने 51.33 च्या सरासरीने आतापर्यंत 6622 धावा केल्या असून त्यात सात शतकांचा समावेश आहे.
मितालीने १९९९ मध्ये वनडेत पदार्पण केले होते. आयर्लंडविरोधात ती पहिला वनडे सामना खेळली होती. या सामन्यात पदार्पणातच तिने ११४ धावांची शतकी खेळी केली होती. या शतकाच्या जोरावर भारताने १६१ धावांनी दणदणीत विजय मिळवला होता.

३५ वर्षीय मिताली १० कसोटी सामने आणि ७२ टी-२० सामनेही खेळली आहे. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय वनडे सामने खेळणाऱ्या महिला क्रिकेटपटूंमध्ये भारताची झूलन गोस्वामी तिसऱ्या स्थानी असून ती आतापर्यंत १६७ वनडे सामने खेळली आहे.