मिताली राजची ट्वेंटी २० क्रिकेटमधून निवृत्ती

 टीम महाराष्ट्र देशा:- भारतीय महिला क्रिकेट संघाची अनुभवी फलंदाज मिताली राज हिने ट्वेंटी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्तीची घोषणा केली आहे.३६ वर्षीय मितालीने ट्वेंटी -२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकूण २ ,३ ६४ धावा केल्या असून या प्रकारात कोणत्याही भारतीयांकडून हा सर्वाधिक विक्रम आहे.

ट्वेंटी -२० आंतरराष्ट्रीय निवृत्तीची घोषणा करताना ती म्हणाली की आता मी एकदिवसीय सामन्यांकडे लक्ष देईल आणि २०२१ विश्वचषक स्पर्धेच्या तयारीसाठी तीच उर्जा कायम ठेवेल. मितालीने भारतीय संघाचे ऐकून ३२ ट्वेंटी-२० सामन्यात भारताचे नेतृत्व केले. यामध्ये २०१२, २०१४, आणि २०१६ च्या विश्वचषकाचे नेतृत्व तिने केले. तिची २००६ मध्ये भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड झाली होती. मितालीने यावर्षी ९ मार्च रोजी गुवाहाटी येथे शेवटचा ट्वेंटी -२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात तिने ३२ चेंडूत ३० धावांची नाबाद खेळी खेळली केली होती.

दरम्यान निवृतीची घोषणा केल्यानंतर मिताली म्हणाली की, देशासाठी विश्वचषक जिंकण्याचे माझे स्वप्न आहे आणि मला सर्वोत्तम कामगिरी करण्याची माझी इच्छा आहे. मी सतत बीसीसीआयच्या सहकार्याबद्दल मी आभारी आहे. आणि भारतीय ट्वेंटी -२० महिला संघाला दक्षिण आफ्रिकेविरूद्ध घरच्या मालिकेची शुभेच्छा असे ही ती म्हणाली.