fbpx

मिचेल जॉन्सनची सर्व सामन्यांमधून निवृत्ती

मेलबर्न – ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा माजी डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सनने सर्व प्रकारच्या सामन्यातून आपली निवृत्ती जाहीर केली आहे. 2015 मध्ये त्याने आंतरराष्ट्री सामन्यांना अलविदा केले होते. त्यानंतर मात्र टी-20 सामन्यात तो विविध देशात होणाऱ्या स्पर्धेत तो खेळत होता. या आगोदरच त्याने ऑस्ट्रेलियातील बिग बॅश स्पर्धेत आपण खेळणार नसल्याचे जाहीर केले होते. आयपीएल स्पर्धेत त्याने कोलकाता संघाचे प्रतिनिधित्त्व केले होते. आता पहिल्या सारखे शरीर साथ देत नसल्यामुळे त्याने सर्व सामन्यातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

निवृत्ती स्वीकारताना काय म्हणाला जॉन्सन :
“जेव्हा मी पर्थ स्कोचर्सच्या प्रशिक्षक अॅडम व्होग्सबरोबर बसलो होतो तेव्हा माझ्या भविष्याविषयी आम्ही चर्चा केली.ते मला पुढच्या वर्षी खेळताना बघण्यास उत्सुक होते. मला अजूनही विश्वास आहे की मी खेळणाऱ्या संघाला माझ्या अनुभवासह मदत करेल. पण मला वाटते मी मानसिकरित्या थकलो आहे.जर मी 100 टक्के खेळू शकत नसेल तर मी संघाला माझे सर्वोत्तम देऊ शकत नाही. माझ्यासाठी संघ महत्त्वाचा आहे.माझ्यातील खेळाडू मला सोडणार नाही त्यामुळे आशा आहे की मी याचा उपयोग भविष्यात प्रशिक्षण किंवा मार्गदर्शन करण्यासाठी करेल. क्रिकेट माझी ताकद आहे.”

लोकसभा निवडणुकांआधी भाजपला धक्का, आणखीन एका मित्रपक्षाचा रामराम