परीक्षेला बसू न दिल्याने विद्यार्थ्याचा तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न

औरंगाबाद – एमआयटी महाविद्यालयात विद्यार्थ्यानं इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. सचिन वाघ असे विद्यार्थ्याचे नाव असून तो नर्सिंग प्रथम वर्षामध्ये शिक्षण घेत होता.

सचिन नर्सिंगच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होता. काॅलेजनं त्याला ‘ सिक्स मंथ बॅक’ ही शिक्षा दिली होती. म्हणजे जे विद्यार्थी वेळेत फी भरत नाहीत किंवा गैरहजर राहतात त्यांना काॅलेज सहा महिने मागे पाठवतं. सचिन काॅलेज फी भरू शकत नव्हता, अशी चर्चा काॅलेजमध्ये सुरू आहे.आजपासून (मंगळवार) परीक्षा सुरू झाली आहे मात्र त्याला परीक्षेला बसू न दिल्याने त्याने टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. काॅलेजकडून काही अधिकृत माहिती कळलेली नाही.