कुलगुरूनीं पुसली विद्यार्थ्यांच्या तोंडाला पाने

savitribai fule pune university१
पुणे : एम आय टी कॉलेज अभियांत्रीकी महाविद्यालयात परीक्षेला हजर असूनही विद्यार्थ्यांना मार्कशीट वर गैरहजर दाखवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार महाराष्ट्र देशाने उघडकीस आणला. हे प्रकरण मध्यमांनी उचलून धरल्यावर देखील मुजोर विद्यापीठ प्रशासन या प्रश्नी फारसं गंभीर नसल्याचं चित्र आहे .आज स्वतः कुलगुरू या विद्यार्थ्यांना भेटणार होते मात्र विद्यार्थी आणि कुलगुरू यांची भेट झाली नाही
विद्यपीठाच्या गलथान कारभारामुळे एकूण अकरा विद्यार्थ्यांचे या भवितव्य धोक्यात आले आहे. विद्यार्थी गेली पंधरा दिवस विद्यापिठात पायपीट करत आहेत. मात्र विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना शून्य  प्रतिसाद मिळाला आहे. कुलगुरुनी विद्यार्थ्यांना आज दी- 26 जुलै रोजी दुपारी भेटण्यासाठी वेळ दिली होती. सर्व विद्यार्थी विद्यापीठात गेले असता. त्यांच्याकडे अक्षरशः दुर्लक्ष करण्यात आले.आता विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी  कुलगुरूकडून पुढील 2 ऑगस्ट तारीख देण्यात आली. परंतु काही विद्यार्थ्यांना 30 जुलै च्या आता पुढील शिक्षणासाठी प्रवेश घ्यायचा आहे. त्यामुळे संतापून विद्यार्थ्यांनी कुलगुरूला 3 दिवसाचा अल्टिमेट दिला आहे. विद्यापीठात हे प्रकरण सतत होत असल्यामुळे विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. चुकीच्या मार्कशीट देने, गैरहजर दाखवणे त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षण व्यवस्थेवर प्रश्न चिन्ह निर्माण केले आहे.
विद्यापीठाची तोंडी परीक्षा देऊनही मार्कशीट वर गैरहजर आल्यामुळे मला एमबीए साठी प्रवेश घेण्यास अडथळा येत आहे. आम्ही विद्यापिठात रोज येतोय मात्र आम्हाला मानसिक त्रासाला समोरे जाव लागत आहे. कुठलाही निर्णय घेण्यास विद्यापीठ अजिबात खंबीर नाही आहे. आज 11 वाजेची वेळ देऊनही आम्हाला विद्यापीठाकडून केराची टोपली देण्यात आली.
पृथ्वी घंटी
विद्यार्थी एमआयटी, पुणे
   कुलगुरुंचा निष्काळजीपणा समोर आला आहे. गेली पंधरा दिवस आम्ही विद्यापिठात हेलपाठा मारत आहो. तसेच परीक्षा विभाग जाणूनबूजून विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करत आहे. विद्यापीठात कुलगुरू हजर असूनही त्यांनी भेट दिली नाही. यातून हे सिद्ध होते की कुलगुरू परीक्षा विभागाला पाठीशी घालतात. सदर प्रकरणचि विद्यापीठाने दखल घेतली नाही तर जेडीयू सर्व मुलांसोबत उपोषणाला बसेल.
कुलदीप अांबेकर, सरचिटणीस युवा जेडीयु महाराष्ट् राज्य

 

काय आहे नेमकं प्रकरण वाचा हि लिंक-

विदयार्थी परीक्षेला ‘हजर ‘ मात्र विदयापीठाच्या ‘मार्कशीट’वर गैरहजर